आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा जम्मू काश्मीरचा मुद्दा उचलला आहे. शुक्रवारी पाकिस्तानचेपंतप्रधानइम्रान खान यांनी यासंदर्भात काही ट्वीट्स केली. तसंच गेल्या सात दशकांपासून भारतानं काश्मीरच्या लोकांचा आवाज दाबला असल्याचं म्हणत पाकिस्तान कायमच काश्मीरच्या लोकांची साथ देईल असं म्हटलं. इम्रान खान यांनी शुक्रवारी यासंदर्भात लोगापाठ काही ट्वीट केली. संयुक्त राष्ट्राच्या नियमांनुसाप पाकिस्तान जम्मू काश्मीवरवरील तोडगा काढू इच्छित असल्याचं ते यावेळी म्हणाले. काश्मीरची नवी पीढी आपली लढाई लढत आहे आणि पाकिस्तान कायम त्यांच्यासोबत आहे. पाकिस्तान आपल्या बाजूनं शांततेसाठी दोन पावलं पुढे येण्यास तयार असल्याचंही इम्रान खान यांनी नमूद केलं. जम्मू काश्मीरचा मुद्दा पुन्हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणण्यासाठी शुक्रवारी पाकिस्तानकडून 'काश्मीर सॉलिडॅरिटी डे'चं आयोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत पाकिस्तानच्या निरनिराळ्या भागांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
UNSC च्या ठरावांप्रमाणे काश्मीरवर तोडगा निघावा; पाकिस्तान शांततेसाठी तयार : इम्रान खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:05 IST
पाकिस्तानात करण्यात आलं 'काश्मीर सॉलिडॅरिटी डे'चं आयोजन
UNSC च्या ठरावांप्रमाणे काश्मीरवर तोडगा निघावा; पाकिस्तान शांततेसाठी तयार : इम्रान खान
ठळक मुद्देपाकिस्तानात करण्यात आलं 'काश्मीर सॉलिडॅरिटी डे'चं आयोजनयापूर्वी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनीही केलं होतं शांततापूर्ण वातावरणात चर्चा करण्याचं वक्तव्य