शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

Pakistan: 'जय श्री राम आणि हर हर महादेव'च्या घोषणेसह कराचीत मंदिर तोडफोडीविरोधात हिंदूंची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 4:19 PM

पाकिस्तानच्या कराचीमध्ये राहणाऱ्या अल्पसंख्यांकांनी रविवारी सातत्याने होणाऱ्या अत्याचाराविरोधात निदर्शने केली.

कराची:पाकिस्तानच्या रहिम यार खान भागातील मंदिरात नुकत्याच झालेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर तेथे राहणाऱ्या हिंदू समाजातील लोकांचा संताप चांगलाच वाढला आहे. दरम्यान, पाकिस्तानातील कराची येथे राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्याकांनी रविवारी सातत्याने होणाऱ्या अत्याचाराविरोधात निदर्शनं केली. या दरम्यान, कराचीमध्ये 'जय श्री राम' आणि 'हर हर महादेव' च्या घोषणा दिल्या गेल्या.

रविवारी कराचीच्या प्रेस क्लबबाहेर अल्पसंख्यांक हिंदू समुदायाचे लोक आंदोलनात सहभागी झाले होते. हिंदू समुदायाशिवाय, शीख, पारशी, ख्रिश्चन आणि इतर वर्गातील लोकही होते. यावेळी जमलेल्या लोकांनी नुकत्याच झालेल्या मंदिरातील तोडफोडीच्या घटनेचा निषेध केला आणि अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवला. यावेळी आंदोलकांनी हर हर महादेव, जय श्री रामच्या घोषणा देण्यासोबतच भगवे झेंडे फडकवत 'आम्हाला न्याय हवा' या शब्दांसह फलकही लावले.

काय म्हणाले आंदोलक ?कराचीतील प्रसिद्ध प्राचीन हनुमान मंदिराचे मुख्य पुजारी रामनाथ मिश्रा महाराज हेही विरोध प्रदर्शनात सहभागी झाले होते. रहिम यार खानमध्ये गुंडांनी ज्या प्रकारे गणेश मंदिराची तोडफोड केली, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. ज्याप्रमाणे इस्लाममध्ये धर्माच्या विरोधात वाईट कृत्ये करणाऱ्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा दिली जाते, त्याचप्रमाणे आपल्या धर्माविरुद्ध वाईट कृत्य करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. अलीकडे पाकिस्तानमध्ये हिंदूंवरील अत्याचार वाढले आहेत, असे ते यावेळी म्हणाले.

भारतात हिंदू-मुस्लिम शांततेन राहतातयावेळी कराचीचे मुफ्ती फैसलही या निदर्शनात सहभागी झाले होते. ते म्हणाले की, मी मुस्लिम आहे, पण समाजांमध्ये द्वेष निर्माण करणारे प्रसंग घडू नये, असं मला वाटतं. आजही भारताच्या आत मुस्लिम अल्पसंख्यांक आहेत, आपले अनेक नातेवाईक भारताच्या विविध शहरांमध्ये राहतात आणि तेथे सर्वजण आनंदी आहेत, असं ते म्हणाले. 

काय आहे प्रकरणपाकिस्तानमधील रहीम यार खान भागात एका गणेश मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बराच वाद झाला. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनीही घटनेचा निषेध केला होता, तर पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई केली होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानHinduहिंदूMuslimमुस्लीमImran Khanइम्रान खान