ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ३१ - सरकारविरोधी आंदोलनामुळे देशात राजकीय अराजकता असल्याची शक्यता पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी फेटाळल्यानंतर काही तासांतच आंदोलकांनी संसदेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अश्रधुर, आणि गोळीबारात ७ आंदोलन कर्त्यांचा मृत्यू झाला असून ४५ जण जखमी झाल्याची पाकिस्तान वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे. विरोधी पक्षनेते इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाच्या आणि धर्मगुरू ताहिरुल कादरी यांच्या समर्थकांनी गेल्या पंधरा दिवसांपासून संसदेला वेढा घातला होता. मात्र, हे "पेल्यातील वादळ‘ असल्याचे सांगत शरीफ यांनी राजकीय अराजकतेची स्थिती असल्याचे आज नाकारले होते. याचाच परिणाम म्हणून आंदोलक आक्रमक झाले आहेत. ठार झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या मृत्यूला पंतप्रधान नवाज शरीफ जबाबदार असल्याचा आरोप इमरान खान यांनी केला आहे.