शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

शाहबाज पाकचे नवे ‘वझीर-ए-आझम’, पंतप्रधानपदी बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 6:05 AM

गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानच्या राजकीय पटावर सुरू असलेले राजकीय नाट्य अखेरीस सोमवारी संपुष्टात आले.

इस्लामाबाद :

गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानच्या राजकीय पटावर सुरू असलेले राजकीय नाट्य अखेरीस सोमवारी संपुष्टात आले. पंतप्रधान निवडीच्या प्रक्रियेवर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाने बहिष्कार टाकल्याने पाकिस्तान मुस्लीम लीगचे (नवाझ) अध्यक्ष शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी बिनविरोध निवड झाली. पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीच्या १७४ सदस्यांनी शरीफ यांच्या बाजूने मतदान केले.

इम्रान खान यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव ऐनवेळी फेटाळण्यात आल्याने गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानात राजकीय नाट्य सुरू होते. पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात मध्यस्थी करत इम्रान यांना नॅशनल असेम्ब्लीमध्ये शक्तिपरीक्षण करण्याचे निर्देश दिले होते. परंतु शनिवारी मध्यरात्रीनंतर राजकीय हालचालींना वेग येऊन इम्रान यांना पंतप्रधानपदावरून दूर करण्यात आले. पंतप्रधानपदासाठी शाहबाज शरीफ आणि इम्रान यांच्या पक्षाचे शाह मेहमूद कुरेशी यांच्यात स्पर्धा होती. 

सोमवारी नॅशनल असेम्ब्लीमध्ये मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच इम्रान यांच्या पक्षाने या प्रक्रियेवर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच तहरीक-ए-इन्साफच्या सर्व प्रतिनिधींनी सभात्याग केला आणि शाहबाज शरीफ यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. सभापतींचा गोंधळ- नॅशनल असेम्ब्लीने शाहबाज यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करताना सभापती अयाज सादिक यांनी शाहबाज यांच्या नावाचा उच्चार नवाझ शरीफ असा केला. - चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी शाहबाज शरीफ असा उल्लेख केला. 

वाईटावर चांगल्याचा विजयचांगल्याने वाईटावर मिळवलेला हा विजय आहे. देशातील राजकारणात परकीय शक्ती हस्तक्षेप करत असल्याची इम्रान यांची बतावणी हे नाटक आहे. इम्रान यांच्या आरोपात थोडे जरी तथ्यांश आढळले तर मी राजीनामा देईन.     - शाहबाज शरीफ, पंतप्रधान 

पाकचा सर्वात मोठा अपमानज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. खटले सुरू आहेत. अशा व्यक्तीची पंतप्रधानपदी निवड होणे हा देशाचा सर्वांत मोठा अपमान आहे. अशांसोबत असेम्ब्लीमध्ये बसण्यापेक्षा राजीनामा देणे बरे.     - इम्रान खान, माजी पंतप्रधान 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान