नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानसोबतचे शांतता राखण्याची आणि मैत्रीचे संबंध सुधारण्याची संधी गमावली आहे, आता शांतता अशक्य आहे असे वक्तव्य पाकिस्तानचे संरक्षणमंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी केलं आहे. माध्यमांच्या रिपोर्टनुसार, खुर्रम यांनी सिनेटच्या बैठकीमध्ये हे वक्तव्य केलं आहे.
सध्याच्या भारत सरकारने पाकिस्तानविरोधातील आपल्या शुत्रुता आणि विरोधी भूमिकेमुळं आता भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतीचे संबंध प्रस्तापित होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे त्यांनी वक्तव्य केलं आहे. ते पुढे म्हणाले की, भारतानं संधी गमावली आहे, पाकिस्तानमध्ये भारताबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी राजकीय एकमत झालं होतं. पण भारताकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांनी सुंजवा येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानाला धमकी दिली होती. त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत पाकिस्तानच्या खुर्रम यांनी हे वक्तव्य केलं आहे. सुंजवा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा भारतीय जवानासह एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. जानेवारी 2018 पासून दहशतवाद्यानं 200 पेक्षा आधिकवेळा सीमारेषेचा उल्लंघन केलं आहे.
दीड महिन्यात 20 पाकिस्तानी जवानांना भारतीय लष्करानं केलं ठार
भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या मुसक्या आवळत आतापर्यंत 20 सैनिकांना ठार केलं आहे. पाकिस्तानच्या अनेक चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. यानंतर पाकिस्तानने सीमारेषा परिसरातील चौक्यांवर रेड अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानी अधिका-यांचे दौरेही वाढले आहेत. गतवर्षी सीमेपलीकडील 138 जवानांना ठार केल्याची माहिती मिळाली होती. सुत्रांनुसार, लष्कराने गोरिला ऑपरेशन सुरु केलं आहे अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे. पाकिस्तानी लष्कर नियंत्रण रेषेवर दबावात राहिल यासाठी आम्ही रणनीती आखत आहोत. सध्या ते फक्त प्रत्युत्तर देण्याच्या परिस्थितीत आहेत. कारवाई करण्यासाठी कमांडोना मोकळे हात दिले आहेत. कारवाई करण्याआधी पुर्ण ऑपरेशन आखलं जात आहे आणि महत्वाची पाऊलं उचलली जात आहेत. आमच्या याच कारवायांना घाबरुन दहशतवादी हल्ले करण्याचे कट आखले जात आहेत असंही अधिका-याने सांगितलं आहे.
पाक करणार कारवाईइस्लामाबाद : लष्कर-ए-तय्यबा, अल-कायदा, तालिबान अशा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना व दहशतवादी लोकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पाकिस्तान सरकारने दहशतवादविरोधी कायद्यात दुरुस्ती केली आहे. त्या संदर्भात काढलेल्या एका अध्यादेशावर त्या देशाचे अध्यक्ष ममनून हुसैन यांनी स्वाक्षरी केली.