वॉशिंग्टन : पाकिस्तानला ‘दहशतवादाचा प्रायोजक’ घोषित करण्याची मागणी करणारे एक विधेयक अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये सादर झाले आहे. दहशतवादाशी संबंधित उपसमितीचे अध्यक्ष टेड पो यांनी ‘अविश्वसनीय सहकारी : पाकिस्तान स्टेट स्पाँसर आॅफ टेरेरिजम अॅक्ट’ हे विधेयक सादर केले. टेड पो हे विधेयक मांडताना म्हणाले आहे की, ओसामा लादेनला दिलेला आश्रय वा हक्कानी नेटवर्कशी संबंध हे दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईत पाकिस्तान कुणाच्या सोबत आहे, याचे पुरावे आहेत. पाकची मदत बंद करण्याची हीच वेळ आहे आणि पाकला ‘दहशतवादाचा प्रायोजक देश’ हे नाव द्यायला हवे. या विधेयकात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९० दिवसाच्या आत पाकने आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सहकार्य केले आहे का? याचे उत्तर अहवालाद्वारे सादर करावे, असे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
पाकिस्तान ‘दहशतवादाचा प्रायोजक’
By admin | Published: March 11, 2017 12:21 AM