नवी दिल्ली : कोरोनामुळे भारत एकीकडे जगाला औषध पुरवत असताना शेजारी पाकिस्तान मात्र शस्त्रसंधीचे उल्लंघन, दहशतवादी हल्ले करण्यात गुंतलेला आहे. अवघे जग कोरोनाविरोधात लढत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तान भारताविरोधात लपून-छपून हल्ले करत असताना आता नव्याने सायबर युद्धाला सुरुवात केल्याचे स्पष्ट केले आहे.
सुरक्षा यंत्रणांनी भारत सरकारला दिलेल्या अहवालामध्ये ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. यामध्ये पाकिस्तान सोशल मिडीयाचा वापर करत असून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तिरस्कार पसरवत आहे. यासाठी आखाती देशांना लक्ष्य केले जात आहे, जे भारताचे चांगले मित्र आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानने ट्विटर, फेसबुकसारख्या माध्यमांवर 'इस्लामोफोबिया इन इंडिया' या नावाने मोहिम चालविली आहे. खासकरून सयुक्त अरब अमिरातमध्ये हा विखारी प्रचार केला जात आहे. सध्या ट्विटरवरही #Islamophia_In_India हा टॅग ट्रेंड करत आहे.
अहवालानुसार पाकिस्तान पीएम मोदी यांच्यावर हल्ला करून भारत आणि आखाती देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. यंत्रणांनी तपास करून नॉर्थ ब्लॉकला त्या खात्यांची माहिती देण्यात आलेली आहे, जी ट्रोल करत आहेत. तसेच भारत, पाकिस्तान आणि आखाती देशांमध्ये भारताच्याविरोधात मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तसे पाहिले गेल्यास भारताविरोधात गरळ ओकण्याची ही पहिली वेळ नाहीय. जम्मू-काश्मीरमध्ये लॉकडाऊन लावण्यापासून ते कलम ३७० हटविण्यापर्यंत प्रत्येकवेळी पाकिस्तानने भारताविरोधात खोटा प्रचार केला आहे. मात्र, यामध्ये या देशांनी तटस्थ भूमिका घेत भारताला साथ दिली होती. आजच्या या प्रचारामागे पाकिस्तानची दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणारी सरकारी यंत्रणा आयएसआयचा हात आहे.
आणखी वाचा....
अमेरिकेने वाळीत टाकले, चीनने WHO साठी अख्खी तिजोरीच खुली केली
सावधान! आता पीएफ अॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल
मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह
नोकरी वाचेल पण... केंद्र सरकार कठोर उपाय योजणार; कर्मचाऱ्यांना फायदा की तोटा?