शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

पाकने ‘जिओ’चे प्रसारण रोखले

By admin | Published: June 06, 2014 10:32 PM

पाकिस्तानी माध्यम नियामक प्राधिकरणाने आज ‘जिओ न्यूज’चा प्रसारण परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित केला आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानी माध्यम नियामक प्राधिकरणाने आज ‘जिओ न्यूज’चा प्रसारण परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित केला आहे. पाक लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआय यांची बदनामी केल्याप्रकरणी एक कोटी रुपयांचा दंडही आकारण्यात येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, या आघाडीच्या वृत्तवाहिनीने गुरुवारीच आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप करत देशातील काही सरकारी संस्थांविरोधात याचिका दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक नियामक प्राधिकरण अर्थात ‘पेमरा’ने ही घोषणा केली. प्राधिकरणाचे प्रमुख परवेध राठौर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
‘प्राधिकरणाने सखोल विचारविनिमयानंतर पेमरा कायद्यांतर्गत तरतुदींन्वये कारवाईचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)
 
 
जिओ न्यूजने कायद्याचे उल्लंघन केल्याची गंभीर दखल घेत त्यांचा प्रसारण परवाना 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला असून त्यांच्याकडून एक कोटी रुपये एवढा दंड आकारला जाणार आहे. दंडाची ही रक्कम परवाना निलंबनाची मर्यादा संपेर्पयत भरावी लागणार आहे,’ असे प्राधिकरणाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दंडाची रक्कम नियत कालावधीत न भरल्यास परवाना निलंबनाची कारवाई कायम राहणार आहे. परवानाधारकाकडून वेळोवेळी नियमांचे उल्लंघन झाल्याच्या स्थितीमध्ये प्राधिकरणाकडून परवाना रद्द करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे.
———————
संरक्षण मंत्रलयाने केली होती बंदीची मागणी
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रलयाने जिओ न्यूजचा परवाना रद्द करण्याची मागणी केली होती. जिओने वाहिनीचे संपादक हमीद मीर यांच्यावरील हल्ल्यास आयएसआय जबाबदार असल्याचे वृत्त प्रसारित केले होते. चॅनलचा मालकी हक्क असलेल्या जिओ टीव्ही नेटवर्क आणि जंग समूहाने सैन्य आणि आयएसआयकडे माफीची मागणी केली होती.
परवाना रद्द करण्याच्या एक दिवसापूर्वी जिओ आणि जंग समूहाने संरक्षण मंत्रलय, आयएसआय आणि पेमरा यांना नोटीस जारी केली होती. वृत्तसमूहाची बदनामी केल्याप्रकरणी या संस्थांनी 14 दिवसांच्या आत सार्वजनिकरीत्या माफी मागावी आणि 5क् अब्ज डॉलरची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती.