शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
3
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
4
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
5
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
6
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
7
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
8
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
9
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
10
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
11
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
12
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
13
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
14
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
15
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
16
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
17
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
18
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
19
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
20
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!

पाकिस्तानची धडपड! तडकाफडकी आदेश काढले; परदेशींना मालमत्ता विकणार, खर्च भागवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 11:57 AM

प्रांतांकडून त्यांच्या ताब्यातील जमिनी अधिग्रहन करण्यासाठीचे अधिकार आपल्या हातात घेतले आहेत. सर्व प्रक्रिया गुंडाळून ठेवत एक अध्यादेश जारी केला आहे. यासाठी ६ कायदे धाब्यावर बसविण्यात आले आहेत. 

भारताविरोधात दहशतवादावर लाखो करोडो रुपये खर्च करणारा पाकिस्तान आता अखेरच्या घटका मोजत आहे. कंगाल तर झालाच आहे पण जगभरातील देशांकडून घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याने जागतिक दिवाळखोर म्हणून घोषित व्हायचे तेवढे बाकी राहिले आहे. तरी देखील पाकिस्तानचा दहशतवाद्यांना सुरु असलेला पुरवठा काही थांबलेला नाहीय.

पाकिस्तानी रुपयाने गेल्या दोन दशकांतील सर्वात खराब प्रदर्शन केले आहे. यामुळे पाकिस्तान आता पुढचा श्रीलंका बनण्याच्या वेशीवर उभा राहिला आहे. यातून सावरण्यासाठी पाकिस्तान आता परदेशांतील तसेच देशातील संपत्ती विकणार आहे. यासाठी संसदेत पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रस्ताव मांडला आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 228 रुपयांवर घसरला आहे. १९९८ नंतर पाकिस्तानी रुपयामध्ये मोठी घसरण झाली आहे. जर आयएमएफकडून १.२ अब्ज डॉलर मिळाले तरी ते आर्थिक संकट दूर करण्यासाठी पुरेसे ठरणारे नाहीत. 

श्रीलंकेमध्ये आर्थिक संकट आणि दिवाळखोरी आल्याने राजकीय संकटही सुरु झाले आहे. पाकिस्तानातही आता तेच होणार आहे. यापासून वाचण्यासाठी शाहबाज सरकारने परदेशातील  तसेच देशातील मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी कॅबिनेटने यासाठी सर्व प्रक्रिया गुंडाळून ठेवत एक अध्यादेश जारी केला आहे. यासाठी ६ कायदे धाब्यावर बसविण्यात आले आहेत. 

यासाठी सरकारने प्रांतांकडून त्यांच्या ताब्यातील जमिनी अधिग्रहन करण्यासाठीचे अधिकार आपल्या हातात घेतले आहेत. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी या अध्यादेशावर सही केलेली नाहीय. असे असले तरी सरकारने या संपत्ती विक्रीच्या कोणत्याही याचिका स्वीकारू नयेत असे आदेश न्यायालयांना दिले आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान