नवी दिल्ली - देशातील गुप्तचर संस्था आणि सुरक्षा दलाच्या चौकशीमुळे पाकिस्तानच्या अनेक डाव उलथवून लावण्यात भारताला यश आलं आहे. परंतु पाकिस्तान त्यांच्या नापाक कुरापतीपासून परावृत्त झालेला नाही. आता भारताविरोधात पाकिस्तानने नवा मार्ग शोधला आहे. एकीकडे पाकिस्तानचे भलेही खाण्याचे वांदे झाले असले तरी तो भारताचा फरारी इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईक याच्यासाठी इस्लामिक देशांकडून निधी गोळा करण्यास मदत करत आहेत.
भारतातून पळून गेलेला झाकीर नाईक सध्या मलेशियात राहत आहे. त्याठिकाणाहून त्याच्या कट्टरपंथी कारवायात कमी झाली नाही. यासाठी तो अजूनही जगभरातून निधी जमा करत आहे. या कामात त्याला पाकिस्तानकडून पूर्ण सहकार्य मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान नाईकसाठी निधी गोळा करण्यासाठी तुर्की आणि कतारशी आपले निकटचे संबंध वापरत आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार नाईकने कतारमधील आपला जुना साथीदार अब्दुल्ला अली अल इमादी याच्याकडे जाऊन त्याच्या धर्मादाय संस्थांसाठी ५ लाख डॉलर्सची मागणी केली होती. कतारचा एक जुना मित्र सहयोगी नाईकला कतार व्यापारी आणि धर्मादाय संस्थांकडून निधी गोळा करण्यास मदत करत आहे. नाईक याने कतार आणि युएईसह अनेक आखाती देशांमध्ये बँक खाती उघडली आहेत. याद्वारे, तो त्याच्या सहयोगी आणि नेटवर्ककडे निधी हस्तांतरित करतो.
जुलै २०१६ मध्ये ढाका येथे बेकरीवर दहशतवादी हल्ला झाला होता. यात पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी कबुली दिली की, त्यांना नाईक यांच्या शिकवणीने प्रेरणा मिळाली, त्यानंतर नाईक गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आला. या हल्ल्यानंतर नाईकच्या पीस टीव्हीवर भारत आणि बांगलादेशात बंदी घालण्यात आली. बांगलादेश सरकारनेही 2016 मध्ये नाईकच्या पीस मोबाइल हँडसेटवर बंदी घातली होती. हा मोबाइल बेक्सिमको ग्रुपद्वारे आयात केला होता आणि इस्लामिक मोबाइल हँडसेट म्हणून विकला गेला.
नाईकवर मनी लाँड्रिंग आणि द्वेष पसरवणारी भाषणे दिल्याचा आरोप आहे. ढाका येथे झालेल्या बॉम्बस्फोटात नाव आल्यानंतर तो मलेशियात पळून गेला. नाईक यांच्या प्रत्यार्पणासाठी सरकारने मलेशियन सरकारला औपचारिक विनंती केली आहे. एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, सरकार हे प्रकरण मलेशियन सरकारसोबत उचलून धरत आहे. नाईक यांच्या प्रकरणाची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) चौकशी करत आहे. नुकताच नाईकचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये त्याने गैरमुस्लिमांना मुस्लिम देशांच्या वर्चस्वाची धमकी दिली. जर कोणी गैर मुसलमानाने इस्लामविरूद्ध काही लिहिले असेल तर त्यांना मुस्लिम देशात आल्यावर त्याला अटक केली पाहिजे असं सांगितले होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
“आज देशाकडे सक्षम नेतृत्व, कोणत्याही परिस्थितीत भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोहचणार नाही”
शिवसेना नेत्याच्या हत्येमागे धक्कादायक खुलासा; भाजपा नेत्यासह ४ आरोपींना केली अटक
तुझं तोंड पाहिलं तरी माझा लग्नाचा विचार बदलतो; युजर्सच्या ट्रोलवर काय म्हणाली स्वरा भास्कर? पाहा
वुहानमधील ‘या’ कारचा फोटो का होतोय व्हायरल?; सोशल मीडियावर अनेकांकडून शेअर