Pakistan Imran Khan : पाकिस्तानातील राजकीय संकटादरम्यान सर्वोच्च न्यायालयानं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना झटका दिला आहे. उपसभापतींचा निर्णय असंवैधानिक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. आता येत्या ९ एप्रिल रोजी अविश्वास प्रस्तावावर मतदान केलं जाणार आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो आणि आम्ही अविश्वास प्रस्तावाचा सामना करण्यासाठी तयार आहोत असं पीटीआयच्या एका नेत्यानं सांगितलं.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नॅशनल असेंब्ली पुन्हा स्थापित झाली आहे. यासह इम्रान खान हे पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधानही झाले आहेत. "पंतप्रधान संविधानाला बांधिल आहेत. त्यामुळे ते राष्ट्राध्यक्षांना संसद बरखास्त करण्याचा सल्ला देऊ शकत नाहीत. जर अविश्वास प्रस्ताव यशस्वी झाल्यास नव्य पंतप्रधानांची निवड केली जावी," असं न्यायालयाने म्हटले आहे.
Pakistan Imran Khan : 'संसद बरखास्त करण्याचा निर्णय असंवैधानिक'; इम्रान खान यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 9:40 PM