शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

पाकमध्ये तुरुंग फोडण्याचा प्र्रयत्न उधळला

By admin | Published: February 13, 2016 3:42 AM

पाकिस्तानी लष्कराने डॅनियल पर्लचा मारेकरी व अल-काईदाचा प्रमुख नेता अहमद ओमर सईद शेख याच्या सुटकेसाठी कारागृह फोडण्याचा प्रयत्न उधळून लावत जवळपास १००

कराची : पाकिस्तानी लष्कराने डॅनियल पर्लचा मारेकरी व अल-काईदाचा प्रमुख नेता अहमद ओमर सईद शेख याच्या सुटकेसाठी कारागृह फोडण्याचा प्रयत्न उधळून लावत जवळपास १०० खतरनाक दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे अतिरेकी अल-काईदा, लष्कर- ए- झांगवी व तेहरिक- ए- तालिबान पाकिस्तान या संघटनांशी संबंधित असून, दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी त्यांनी संयुक्त कृती पथक स्थापन केले होते, असे लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल असीम सलीम बजवा यांनी सांगितले. हल्ले घडवून आणण्यासाठी या संघटना परस्परांशी सहकार्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आमचा निष्कर्ष आहे, असेही ते म्हणाले. कराची शहरात या ९७ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. मेहरान हवाई तळ, जिन्ना विमानतळ आणि पाकिस्तान हवाई दल तळ यासह इतर अनेक मोठ्या हल्ल्यांत त्यांचा सहभाग होता. या अतिरेक्यांनी उमर शेखची सुटका करण्यासाठी हैदराबाद तुरुंग फोडण्याचा कट आखला होता व तो लवकरच अमलात आणण्यात येणार होता. दहशतवाद्यांनी स्फोटके लादलेली दोन वाहने तयार ठेवली होती. ही वाहने तुरुंगाच्या दरवाजावर आदळविण्याची योजना होती. उमर याच्यासह इतर शेकडो जणांची सुटका करताना तुरुंगातील ३५ कैद्यांना ठार मारण्याची त्यांची योजना होती. डॅनियल पर्ल यांच्या हत्येप्रकरणी उमरला मृत्युदंड ठोठाविण्यात आला आहे. पर्ल द वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार होते. पाकची गुप्तचर संघटना आयएसआय व दहशतवादी संघटनांतील कथित संबंधांची ते बातमी काढत होते. उमर शेख भारतात कैद होता. अपहृत भारतीय विमानातील १५० प्रवाशांच्या बदल्यात १९९९ मध्ये त्याची भारताने सुटका केली होती.