पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सत्ता सोडावी लागली आहे. आपल्या अटकेची भीक मागत इम्रान यांनी अविश्वास प्रस्तावाच्या आधीच संसद सोडली. आता नवाझ शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ पाकचे नवे पंतप्रधान होणार आहेत. शाहबाज यांच्याबाबत अशी माहिती समोर येत आहे, की त्यांचे आणि अनेक लग्नांचे मोठे नाते राहिले आहे.
इम्रान खानचीही अनेक लग्ने झाली होती. सत्तेत आल्यानंतर इम्रानने एका रहस्यमय महिलेशी लग्न केले होते. या महिलेने इम्रान यांचे पद राहण्यासाठी काळी जादू सुरु केली होती. परंतू ती काही चालली नाही. पण आता शाहबाज यांच्या पाच लग्नाची गोष्ट चवीने चर्चिली जाऊ लागली आहे. शाहबाज यांच्याबाबत अनेक कहान्या आहेत. शाहबाज यांची पाच लग्ने झाली परंतू त्यातील बहुतांश लग्ने गुप्तच ठेवण्यात आली.
शाहबाज यांचे पहिले लग्न त्यांची चुलत बहिण बेगम नुसरत हिच्याशी झाले होते. त्यांचा विवाह 1973मध्ये झाला होता. या दोघांना ५ मुले आहेत. नुसरत यांचा १९९३ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर शाहबाज यांनी दुसरे लग्न केले. नरगिस खोसा सोबत त्यांचे दुसरे लग्न झाल्याचे सांगितले जाते. या लग्नाला मोठमोठे राजकीय नेते आले होते.
तिसरे लग्न आणि तिच्यासाठी हनी ब्रिज...शाहबाज यांनी सौदीमध्ये आलिया हनीसोबत सिक्रेट लग्न केले होते. पण याची वाच्यता झाल्यावर त्यांनी आलियाला तलाक दिला होता. सौदीत एक पूल आहे, त्याला हनी ब्रिज किंवा घोडेस्वारांचे पूर असे म्हटले जाते. ते म्हणे शाहबाज यांनी वाहतूक कोंडीतून दुसऱ्या पत्नीकडे वेळेत पोहोचण्यासाठी बांधल्याचे सांगितले जाते. तलाकनंतर सहा महिन्यांत आलियाचा मृत्यू झाला. आलियापासून त्यांना एक मुलगी आहे. तिचे नाव खदीजा शरीफ आहे.
शाहबाज यांनी २००३ मद्ये दुबईत तहमीना दुर्रानी लग्न केले. ती आता लाहोरमध्ये राहते. तिने याआधी माजी मुख्यमंत्री गुलाम मुस्तफा खार सोबत लग्न केले होते. १४ वर्षे या दोघांचा संसार चालला नंतर तिने शारहबाज यांच्याशी लग्न केले होते. हे लग्न देखील सिक्रेटत होते. तिच्या बायोग्राफीमध्ये पहिल्यांदाच शाहबाज यांच्या पाच लग्नांचा खुलासा झाला होता.
२०१२ मध्ये पुन्हा शाहबाज यांचे नाव चर्चेत आले. शाहबाज यांनी एक महिलेला तिच्या पतीला तलाक देण्यासाठी तयार केले. यानंतर तिच्याशी लग्न केले. ती पाकच्या पंजाब पोलिसमध्ये अधिकारी होती. तिचे नाव कलसूम हया असल्याचे सांगतिले जाते. धक्कादायक बाब म्हणजे लग्नाआधीपासूनच तिला शाहबाज यांच्यापासून तीन मुले झाली होती. या लग्नाला शाहबाज यांच्या कुटुंबाने अद्याप मान्यता दिलेली नाही.