शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 5:53 PM

Pakistan Helicopters Wheat Crop Viral Video: पाकिस्तानात अत्यधुनिक कोब्रा हेलिकॉप्टर्स पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकवण्यासाठी तैनात केली गेल्याचा दावा टिकटॉक सोशल मीडियावर करण्यात आला आहे.

Pakistani Helicopters for Drying Wheat Crop Viral Video Truth: पाकिस्तानमधील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. भारतात बॅन असलेल्या टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ सर्वाधिक व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गव्हाच्या शेतावर लष्कराची काही हेलिकॉप्टर्स घिरट्या घालताना दिसत आहेत. पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकवण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर वापरले जात असल्याचा दावा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना केला जात आहे. कारण अलीकडेच जवळजवळ तयार होत आलेले गव्हाचे पीक पावसामुळे ओले झाले होते. त्यामुळे व्हिडिओमध्ये गव्हाच्या शेताच्या वर ज्या प्रकारे काही हेलिकॉप्टर थांबले आहेत त्यावरून प्रथमदर्शनी हा दावा खरा वाटतो. पण तो केवळ भास आहे. व्हिडिओबाबत करण्यात येत असलेल्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही.

नेमका दावा काय?

गेल्या तीन-चार दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, कोब्रासारखे अत्यधुनिक हेलिकॉप्टर गव्हाच्या शेतावर दिसत आहेत. या हेलिकॉप्टरचा वापर पाकिस्तानी लष्कराकडून केला जातो. हा व्हिडीओ शेअर करताना काही यूजर्स म्हणत आहेत की, हे हेलिकॉप्टर पंजाबमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या शेतातील गव्हाचे पीक सुकवण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही लोक यासाठी पाकिस्तान सरकारची खिल्ली उडवत आहेत.

व्हिडिओमागचे सत्य काय?

बीबीसी उर्दूच्या रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ कधी आणि कुठे शूट करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा स्थितीत ते पाकिस्तानचे आहे असे म्हणणे अयोग्य ठरेल. तसेच हा व्हिडीओ सध्याचा किंवा याच वर्षाचा असल्याबाबतही साशंकता आहे. पण हेलिकॉप्टर गहू सुकवत नसल्याचे अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. बीबीसी उर्दूने एका माजी आर्मी एव्हिएशन अधिकाऱ्याला विचारले की गहू सुकवण्याबाबतचा दावा खरा आहे का? अधिकाऱ्याने सांगितले की हा दावा साफ खोटा आहे. कारण व्हिडिओमध्ये दिसणारे हेलिकॉप्टर सामान्यत: लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे वापरल्या जाणाऱ्या फॉर्मेशनमध्ये होते. हे कोब्रा हेलिकॉप्टर असल्याचेही त्यांनी ओळखले. त्यामुळे इतक्या क्षुल्लक कारणासाठी अत्यधुनिक हेलिकॉप्टरचा वापर होण्याची तिळमात्र शक्यता नाही, असे ते अधिकारी म्हणाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Viralसोशल व्हायरलTik Tok Appटिक-टॉकHelicopter Eelaहेलिकॉप्टर ईलाWheatगहूCropपीकRainपाऊसprime ministerपंतप्रधान