गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान, आता पाकिस्तानसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जागतिक बँकेने २० अरब अमेरिकी डॉलर कर्जाला मंजूरी दिली आहे. हे कर्ज पुढील १० वर्षात हप्त्यांमध्ये दिले जाईल. या कर्जामुळे पाकिस्तानला राजकीय स्थैर्य राखण्यास आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यात मदत होणार आहे.
पाकिस्तानसाठी हे कर्ज पॅकेज 'पाकिस्तान कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क २०२५-३५' अंतर्गत दिले जाईल, या कर्जाचा उद्देश दुर्लक्षित क्षेत्रांमध्ये सुधारणा करणे हा आहे. या योजनेंतर्गत सामाजिक संकेतकांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जाईल आणि पाकिस्तानमधील प्रलंबित प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत. या कर्ज पॅकेजला १४ जानेवारी रोजी जागतिक बँकेच्या बोर्डाकडून अंतिम मंजुरी दिली जाणार आहे.
जागतिक बँक पाकिस्तानला हे कर्ज देत आहे. हे कर्ज पाकिस्तानला १० वर्षांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये दिले जाणार आहे. गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट सुरू आहे, या संकटातून बाहेर येण्यासाठी जागितक बँकेने हे कर्ज दिले आहे.
यासाठी खर्च करावे लागणार
पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या या २० अब्ज डॉलरच्या कर्जापैकी १४ अब्ज डॉलर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशनकडून दिले जातील, तर ६ अब्ज डॉलर इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटकडून दिले जातील. या पैशांचा वापर बाल विकास आणि गरिबी निर्मूलन हवामान बदल आणि उत्पादन वाढीवर काम करण्यासाठी खर्च करावे लागणार आहेत.
पाकिस्तानला २० अरब डॉलर कर्ज मिळण्याशिवाय खासगी क्षेत्रालाही जागतिक बँकेकडून २० अरब डॉलर कर्ज घेण्याची योजना सुरू आहे. हे कर्ज इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन आणि मल्टीलेटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी मार्फत घेतले जाईल, यामुळे एकूणच पाकिस्तानला जागतिक बँकेकडून ४० अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळेल.