चीनच्या भरवशावर पाकिस्तान (Pakistan) मोठी मोठी स्वप्ने पाहू लागला आहे. पाकिस्तान आता मोबाईल फोन (Mobile production) निर्यात करण्याची स्वप्ने पाहू लागला आहे. पाकिस्तानचे अर्थ सल्लागार रझाक दाऊद यांनी एका व्यावसायिक कार्यक्रमात याची घोषणा केली आहे. पाकिस्तान जानेवारी २०२२ पासून देशात बनलेल्या मोबाईल फोनची निर्यात सुरु करणार असल्याचे दाऊद म्हणाले. (Samsung in Ready to build plant in Pakistan. Razak Dawood statement.)
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉननुसार रझाक यांनी सांगितले की, देशात मोबाईल फोनचे उत्पादन सुरु झाले आहे. मी सध्या पाकिस्तानातून मोबाईल फोन निर्यात करण्याची परवानगी मिळण्यासाठी चीनची मनधरणी करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यांनी गेल्या वर्षीच इथे उत्पादन सुरु केले होते. मी त्यांनी डिसेंबर २०२१ चे लक्ष्य दिले होते. त्यांनी मला जानेवारी २०२२ पासून पाकिस्तानातून निर्यात करण्याचे आश्वासन दिले आहे.
दोन वर्षांपूर्वी कोणी विचारही केला नव्हता की पाकिस्तान मोबाईल फोनचे उत्पादन सुरु करेल, तसेच निर्यात करेल. हे एक निर्यातीला बुस्ट करण्यासाठीचे उत्पादन आहे. सध्यातरी कोणतेही निर्यात लक्ष्य समोर ठेवलेले नाहीय, असे दाऊद म्हणाले.
म्हणे सॅमसंग येण्यास तयार...सॅमसंगसारखी मोठी कंपनी पाकिस्तानात येण्यासाठी तयार झाली आहे, असे ते म्हणाले. तर दुसरीकडे पाकिस्तानची हालत कोणापासून लपलेली नाही. वीजेच्या टंचाईमुळे छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडत आहेत. महागाई आकाशात आहे. पीठ, भाज्या, साखरेसारख्या वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. भारतासोबतच्या तणावामुळे पाकिस्तानची आयात देखील मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे. कापूस आणि सिमेंटसाठी पाकिस्तान भारतावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होता. भ्रष्टाचार आणि देशावरील कर्ज एवढे झाले आहे की पाकिस्तानची हालत वाईट झाली आहे.