पाकिस्तानात (Pakistan) एका महिलेने एकाच वेळी तब्बल सात मुलांना जन्म दिल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी सांगितले, अल्ट्रासाउंड आणि इतर रिपोर्टमध्ये, महिलेच्या गर्भात (Pregnant Woman) पाच मुले असल्याचे समजले होते. हे पाहून ते अवाक झाले होते. मात्र डिलिव्हरीनंतर (Baby Delivery) या महिलेने सात मुलांना जन्म दिला. सध्या, सर्व नवजात बालकांची आणि त्यांच्या आईची प्रकृती स्थिर आहे. (Woman gave birth to 7 child at once)
ही घटना खैबर पख्तूनख्वाच्या (Khyber Pakhtunkhwa) एबोटाबाद (Abbottabad) येथील आहे. येथे यार मोहम्मद यांच्या पत्नीला लेबर पेन होऊ लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. जिन्ना इंटरनॅशनल रुग्णालयात यार मोहम्मदच्या पत्नीने या 7 मुलांना जन्म दिला. यात चार मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे.
पतीची प्रतिक्रिया -बीबीसीच्या म्हणण्यानुसार, यार मोहम्मद यांनी म्हटले आहे, की या मुलांच्या पालन-पोषणात त्यांना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कारण ते एकत्र कुटुंबात राहतात आणि कुटुंबातील प्रत्येकजण त्यांना मदत करेल. या 7 मुलांशिवाय, यार मोहम्मद यांना दोन मुलीही आहेत. म्हणजेच त्यांच्या कुटुंबात आता एकूण 9 मुले झाले आहेत.
काय म्हणाले डॉक्टर ? -यासंदर्भात बोलताना डॉक्टर म्हणाले, 8 महिन्यांची गर्भवती असलेली एक महिला शनिवारी पहिल्यांदाच आपल्याकडे आली होती. त्यावेळी तिच्या गर्भात पाच मुले असल्याचे तपासात समोर आले होते. महिलेचा रक्तदाब खूप वाढलेला होता. तसेच तिचे पोटही मोठ्या प्रमाणावर फुललेले होते. ऑपरेशनचा पर्यायही धोकादायक होता, कारण पूर्वी या महिलेचे दोन ऑपरेशन्स झालेले होते. यामुळे तिचे जुने टाके आणि गर्भाशय फाटण्याचीही भीती होती. मात्र, काही डॉक्टरांच्या टीमने एक तासाहून अधिक वेळ चललेली डिलिव्हरी यशस्वी केली. संबंधित महिलेला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. पण, सातही मुले आणि त्यांच्या आईची प्रकृती स्थिर आहे.