शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

भारतीयांपेक्षा पाकिस्तानी नागरिक अधिक समाधानी

By admin | Published: March 18, 2016 1:47 AM

दहशतवादी हल्ल्याची टांगती तलवार, गरिबी आणि निरक्षरता अशा अनेक समस्यांनी वेढलेले असूनही पाकिस्तान आणि बांगलादेशचे नागरिक भारतीयांपेक्षा अधिक समाधानी आहेत.

न्यूयॉर्क : दहशतवादी हल्ल्याची टांगती तलवार, गरिबी आणि निरक्षरता अशा अनेक समस्यांनी वेढलेले असूनही पाकिस्तान आणि बांगलादेशचे नागरिक भारतीयांपेक्षा अधिक समाधानी आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क’च्या २०१५च्या अहवालामध्ये हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.दरडोई उत्पन्न, अपेक्षित आयुर्मर्यादा, सामाजिक आधार आणि जीवनाविषयीचे पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य या घटकांना समाधानाचे निदर्शक मानून आनंदी देशांची क्रमवारी ठरविण्यात आली आहे. २०१५ च्या जागतिक अहवालातील आनंदी १५८ देशांच्या यादीत भारताचा ११७ वा क्रमांक लागतो. २०१३च्या तुलनेत भारताचे या यादीतील स्थान सहा अंकांनी घसरले आहे. तीन वर्षांपूर्वी भारत १११ व्या स्थानी होता. या यादीत पाकिस्तान ८१ व्या तर बांगलादेश १०९ व्या स्थानी आहे. याचाच अर्थ या दोन्ही देशांतील नागरिक भारतांतील नागरिकांहून अधिक समाधानी आहेत. रशियासमर्थक बंडखोरांसोबतच्या संघर्षात भरडला जात असलेला युक्रेन (१११ वे स्थान), इस्रायलसोबतच्या युद्धात होरपळून गेलेला पॅलेस्टाईन (१०८ वे स्थान) व इसिसकडे मोठा भूभाग गमवावा लागलेला इराक (११२ वा क्रमांक) या देशातील नागरिकही भारतीयांहून अधिक समाधानी आहेत. स्वीत्झर्लंड जगातील सर्वात आनंदी देश ठरला. पहिल्या पाच देशांत स्वीत्झर्लंडशिवाय आइसलँड, डेन्मार्क, नॉर्वे आणि कॅनडाचा समावेश आहे. आनंद, समाधान हे सामाजिक प्रगती व सार्वजनिक धोरणाचे उद्दिष्ट मोजण्याचे एकक मानले जाते, असे या अहवालात म्हटले आहे. आनंदी, समाधानी देशांच्या यादीत अमेरिका १५ व्या स्थानावर आहे. (वृत्तसंस्था)तळाचे दहा देशआनंदी देशांच्या यादीत अफगाणिस्तान, सीरिया, टोगो, बुरुंडी, बेनिन, रवांडा, बुर्किना फासो, आयव्हरी कोस्ट, गुनिया आणि चाड या देशांचा तळाच्या दहा देशांत समावेश आहे.