पाकिस्तानातील इस्लामिक स्कॉलर तारिक मसूद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, आपले एक लग्न पंतप्रधान नरेद्र मोदींमुळे मोडल्याचे ते सांगत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, भारताचा व्हिसा न मिळाल्याने त्यांचे एक लग्न होता होता मोडले. एवढेच नाही, तर त्यांना 2019 मध्ये व्हिसा मिळेल, असे वाटत होते. मात्र, नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. तारिक मसूद पाकिस्तानात अधिकाधिक लग्न करा आणि मुलं जन्माला घाला असे सांगत असतात. त्यांनी आतापर्यंत 4 लग्न केले आहेत.
माझे एक लग्न मोडण्यासाठी मोदी जबाबदार -तारिक म्हणाले, "माझेही एक लग्न होणार होते, मात्र मोदी साहेब सत्तेवर आले. यामुळे मला व्हिसा मिळाला नाही. ही जुनी गोष्ट आहे. तेव्हा मोदींचे सरकार नवे नवेच आले होते. आम्ही विचार केला होता की 2019 मध्ये पुन्हा निवडणुका होतील, त्यानंतर बघू. पण पुन्हा मोदीच सत्तेवर आले. माझे एक लग्न मोडण्यासाठी मोदी जबाबदार आहेत."
तारिक पुढे म्हणाले, "आता 10 वर्ष कोण वाट बघणार? मोदी पुन्हा सत्तेत आले तर काय होणार? आम्ही एवढी वाट बघत नाही, आम्ही लगेच पाठवणी होईल असे लग्नकरतो."
चार बायका, 16 मुलं -पाकिस्तानी यूट्यूबर हाफिज अहमदसोबत बोलताना तारिक यांनी खुलासा केला होता की, त्यांना चार बायका आणि त्यांची 16 मुलं आहेत. सर्वांना वेगवेगळ्या घरात ठेवतात. यावेळी, चारही लग्न व्यवस्थित राहिली का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, पहिल्या पत्नीसोबत समन्वय साधण्यात अडचण आली. बराच वेळ टेन्शनमध्ये गेला, असे ते म्हणाले.