कराची - इच्छेविरोधात मुलीचा प्रेमविवाह ठरल्यामुळं एका व्यक्तीनं कुटुंबातील चार जणांची निघृर्ण हत्या केली आहे. पाकिस्तानमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हा प्रकार पंजाब प्रांतात घडला आहे. आसिफ शाह या व्यक्तीनं मुलीचा विवाह आपल्या इच्छेविरोधात ठरवल्यामुळं कुटुंबातील सर्वच सदस्याची हत्या केली आहे.
पंजाब प्रांतातील मारी गावात आसिफ शाह यांच कुटुंब राहतं. त्यांची मुलगी कोमल (वय 26) हिचे एका मुलावर प्रेम होत. आणि ती त्याच्याबोरबर लग्नाच्या बंधनात अडकणार होती. पण आसिफ शाह यांनी मुलीचा तो निर्णय आवडला नाही. आसिफ शाह यांच्या मनाविरोधात जाऊन घरच्यांनी तिचे लग्न ठरवलं.
आसिफ शाह यांनी मग रागाच्या भरामध्ये कोमल (26), रिदा(24) आणि मुलगा अश्त (15) व पत्नी रुकइया यांची गोळी मारुन हत्या केली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकारी (डीपीओ) यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आसिफ शाह एका खासगी कंपनीमध्ये ड्रायव्हर आहे.
रिपोर्टनुसार, कोमलच्या प्रियकरानं लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता. पण आसिफ शाह याच्या विरोधात होता. आसिफ यांनी त्यांचा विरोधही दाखवला. पण सर्व परिवारानं त्यांचा आसिफ शाह यांचा विरोध धुडकावून कोमलचं लग्न ठरवलं. त्यावेळी आसिफ आणि परिवारामध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. भांडण सुरु असताना लग्न नाही थांबवलं तर कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. कुटुंबातील सर्वांनी त्या धमकीकडे दुर्लश करत कोमलचा विवाह ठरवला. रागामध्ये पारा चढलेल्या आसिफ शाहने गोळ्या घालून स्वत: च्या परिवाराची हत्या केली.