गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडली आहे. देश आर्थिक संकटाचा गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहे. दरम्यान, आता सर्व सरकारी कंपन्या सरकारने विकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानमधील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पीओके मधील जनताही सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी खासदार सय्यद मुस्तफा कमाल यांनी आपल्या देशाला आरसा दाखवला आहे.
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
पाकिस्तान नॅशनल असेंब्ली सदस्य सय्यद मुस्तफा कमाल यांनी भारताच्या चांद्र मोहिमेचा उल्लेख करताना, भारताच्या उपलब्धी आणि कराचीची खराब स्थिती यांची तुलना केली आहे. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तानचे नेते सय्यद यांनी नॅशनल असेंब्लीतील भाषणात म्हणाले की, आज कराचीची परिस्थिती अशी आहे की जग चंद्रावर जात असताना कराचीतील मुले गटारात पडून मृत्यू पावत आहेत. त्याच स्क्रीनवर भारत चंद्रावर उतरल्याची बातमी येत आहे आणि अवघ्या दोन सेकंदांनी कराचीत एका उघड्या गटारात पडून मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी येते.
खासदार सय्यद मुस्तफा यांनीही कराचीमध्ये ताज्या पाण्याच्या कमतरतेचा उल्लेख केला. 'कराचीमध्ये ७० लाख मुले आहेत आणि पाकिस्तानमध्ये २.६ कोटीहून अधिक मुले आहेत जी शाळेत जाऊ शकत नाहीत. कराची हे पाकिस्तानचे महसूल इंजिन असले तरी आता तेथे शुद्ध पाणीही नाही, असंही सय्यद मुस्तफा म्हणाले.
सय्यद मुस्तफा म्हणाले की, स्थापनेपासून, दोन बंदरे पाकिस्तानमध्ये कार्यरत आहेत आणि दोन्ही कराचीमध्ये आहेत. कराची हे संपूर्ण पाकिस्तान, मध्य आशिया ते अफगाणिस्तानचे प्रवेशद्वार आहे. १५ वर्षांपासून कराचीला थोडेसे शुद्ध पाणीही मिळत नाही, जे पाणी येते ते टँकर माफिया साठवून ते विकू लागतात.
दुसरीकडे, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, भारताचे चांद्रयान-3 लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे पोहोचणारे देशातील पहिले अंतराळ यान ठरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे, असंही सय्यद मुस्तफा म्हणाले.