शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

फॉली यांच्या बदल्यात हवी होती पाकिस्तानी शास्त्रज्ञाची सुटका

By admin | Published: August 23, 2014 2:05 AM

पाकिस्तानी महिला शास्त्रज्ञासह तुरुंगात डांबण्यात आलेल्यांची सुटका करण्याची मागणी ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेने केली होती

वॉशिंग्टन : अमेरिकी पत्रकार जेम्स  फॉली  यांच्या सुटकेच्या मोबदल्यात पाकिस्तानी महिला शास्त्रज्ञासह तुरुंगात डांबण्यात आलेल्यांची सुटका करण्याची मागणी ‘आयएसआयएस’ या दहशतवादी संघटनेने केली होती. तथापि, अमेरिकेने पत्रकार फॉली यांच्या सुटकेसाठी आम्ही दिलेले अनेक प्रस्ताव फेटाळून लावले, असा दावाही ‘आयएसआयएस’ या संघटनेने फॉली यांच्या कुटुंबियांना 12 ऑगस्ट रोजी पाठविलेल्या ई-मेलमध्ये केला आहे.
ग्लोबल पोस्टने जारी केलेल्या या ई-मेलमध्ये या संघटनेने म्हटले आहे की, अमेरिकी लोकांच्या सुटकेसाठी रोख व्यवहारामार्फत समझोता करण्याच्या अनेक संधी दिल्या. अमेरिकेतील तुरुंगात डांबण्यात आलेल्या डॉ. आफिया सिद्दीकी यांच्यासह इतर मुस्लिमांच्या सुटकेच्या मोबदल्यात आम्ही आमच्या ताब्यातील अमेरिकी नागरिकांची सुटका करण्याचाही प्रस्ताव दिला होता; परंतु आमचे प्रस्ताव फेटाळून लावण्यात आले. त्यातून आपल्या नागरिकांची सुटका करण्याची अमेरिकेची इच्छा नव्हती, हे सिद्ध झाले. इस्लामिक स्टेटने अलीकडेच एक व्हिडिओ जारी करून आयएसआयएसचा एक सदस्य पत्रकार फॉली यांचा शिरच्छेद करताना दाखविले होते. 
 
 
 
2क्12 मध्ये फॉली यांचे सिरियात अपहरण करण्यात आले होते. फॉली यांच्या कुटुंबियांच्या सहमतीअंती हा ई-मेल प्रकाशित करण्यात आल्याचे ग्लोबल पोस्टने म्हटले आहे. तथापि, यात अनेक विसंगती आहेत.
उदाहरणार्थ फॉली यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबियांना संधीच देण्यात आली नाही.(वृत्तसंस्था)
 
4जगभरातील मुस्लिम संघटना आणि नेत्यांनी निर्दयी कृत्याबद्दल आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचा तीव्र निषेध करीत या संघटनेचे कृत्य इस्लामविरोधी असल्याचे म्हटले आहे. यात अमेरिकेतील कौन्सिल ऑन अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्स, इस्लामिक सोसायटी ऑफ नॉर्थ अमेरिका, ऑर्गनायङोशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन, द मुस्लिम पब्लिक अफेयर्स कौन्सिल या मान्यवर संघटनांचा यात समावेश आहे.
 
4डॉ. आफिया सिद्दीकी न्यूरो शास्त्रज्ञ आहेत. 2क्क्8 मध्ये अफगाणिस्तानात त्यांना अटक करण्यात आली होती.  रासायनिक शस्त्रे, डर्टी बॉम्ब आणि विषाणूंशी संबंधित कागदपत्रे त्यांच्याकडे आढळून आली होती.  या कागदपत्रतून त्यांचा अमेरिकेविरुद्ध घातपात करण्याचा बेत असल्याचे संकेत मिळत असल्याचे सांगत अमेरिकेने दहशतवादाच्या  आरोपाखाली त्यांना अटक केली होती. नंतर अमेरिकेच्या एका कोर्टाने त्यांना 86 वर्षाचा तुरुंगवास सुनावला होता.
 
4पत्रकार जेम्स फॉली यांच्या सुटकेसाठी आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने 13 कोटी डॉलरची खंडणी मागितली होती, अशी माहिती ‘ग्लोबल पोस्ट’चे  मुख्य कार्यकारी अधिकारी फिलीप बालबोनो यांनी दिली. नोव्हेंबर 2क्12 मध्ये फॉली यांचे अपहरण करण्यात आले होते.