ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि 20 - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता पनामा पेपर्स लीक प्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांना नोटीस बजावली आहे. सप्टेंबर महिन्यात फेडरल ब्युरो ऑफ रेव्हेन्यू (एफबीआर) ने जवळपास 450 जणांना नोटीस बजावली होती. नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये शरीफ यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे.
पनामा पेपर्स लीक प्रकरणात शरीफ यांची दोन मुले आणि मुलीच्या कंपन्यांचा समावेश असून, ते शरीफ कुटुंबीयांचे परदेशातील व्यवहार सांभाळतात, असा उल्लेख होता. एप्रिलमध्ये उघड झालेल्या पनामा पेपर्स लीकमुळे जगभरात खळभळ उडाली होती. या कागदपत्रांनुसार पनामा येथील मोसाक फोन्सेका ही कंपनी जगभरातील धनाढ्यांच्या कंपन्यांचे व्यवहार सांभाळत असे.
Pakistan media says the country's Supreme Court has issued notice to PM Nawaz Sharif in Panama leaks case— ANI (@ANI_news) October 20, 2016