न्यूयॉर्क : पाकिस्तानने मुत्सद्देगिरीचा उपयोग करावा. छुप्या कारवाया नको, असे मत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ले. जनरल एच. आर. मॅकमास्टर यांनी व्यक्त केले आहे. त्यांचे हे मत म्हणजे, पाकिस्तान सातत्याने भारताविरुद्ध करीत असलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन, पाकिस्तानी घुसखोरी, दहशतवाद्यांना मदत या विरोधातील सणसणीत चपराक आहे, असेच मानले जात आहे.फक्त विशिष्ट अतिरेकी संघटनांनाच पाकिस्तानकडून लक्ष्य करत येत आहे. अफगाणिस्तान आणि अन्य काही ठिकाणी आपल्या हितांचे रक्षण करण्याच्या नावाखाली पाकिस्तान हिंसाचारात सहभागी आहे. मॅकमास्टर यांनी पाकिस्तानवर आरोप केले की, तो देश तालिबानचा छुप्या पद्धतीने वापर करत आहेत आणि त्यांच्या नेत्यांना आश्रयही देत आहेत. युद्धग्रस्त देशाचा दौरा केल्यानंतर मॅकमास्टर यांनी म्हटले आहे की, आम्ही ही अपेक्षा करत आहोत, पाकिस्तानचे नेते हे समजतील की, या समूहांवर म्हणजेच दहशतवादी गटांवर कारवाई करणे त्यांच्या हिताचे आहे. (वृत्तसंस्था)
पाकने छुप्या कारवाया बंद कराव्यात
By admin | Published: April 18, 2017 12:52 AM