शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री म्हणतात, 'अमेरिकेच्या सैन्यासोबत छुपे संबंध ठेवणार नाही, आम्हाला बळीचा बकरा बनवलं जातंय'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 2:03 PM

पाकिस्तानने अमेरिकेसोबत सैन्य आणि गुप्त संबंध तोडणार असल्याची घोषणा केली आहे. द डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांनंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानने अमेरिकेसोबत सैन्य आणि गुप्त संबंध तोडणार असल्याची घोषणा केली आहे. द डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांनंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर खोटारडेपणाचा आणि धोका दिल्याचा आरोप केला होता. यानंतर ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला सुरक्षेसाठी देण्यात येणारी आर्थित मदत थांबवली होती. यावर टीका करताना पाकिस्तानचे संरक्षणमंत्री खुर्रम दस्तगीर खान बोलले आहेत की, 'करोडो डॉलर खर्च केल्यानंतरही अमेरिकेला अफगाणिस्तानात पराभवचा सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तानमधील आपलं अपयश झाकण्यासाठी अमेरिका पाकिस्तानला बळीचा बकरा म्हणून वापरत आहेत. यासाठी आम्ही अमेरिकेच्या सैन्यासोबतचे आणि गुप्त संबंध तोडत आहोत'.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, पाकिस्तान आपल्या बलिदानाची किंमत नाही मागत आहे. यासोबत अमेरिकेला खडे बोल सुनावताना ते बोलले की, 'पाकिस्तानच्या जमिनीवरुन अमेरिकेला अफगाणिस्तानसोबत युद्ध लढण्याची परवानगी दिली जाणार नाही. अमेरिका अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषेवरील सुरक्षेसाठी मदत देण्याऐवजी पाकिस्तानवर आरोप लगावण्यात व्यस्त आहे'.

यासंबंधी पाकिस्तानमधील अमेरिकी दुतावासाशी संपर्क साधला असता आपल्याला अशी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दुतावासचे प्रवक्ता रिचर्ड स्नेलसर यांनी सांगितलं की, 'आर्थिक मदत बंद करण्यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती आम्हाला मिळालेली नाही'. दुसरीकडे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अमेरिकेसोबत चीन, इराण आणि रशियासोबत पाकिस्तानचे संबंध चांगले असणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे.

दुसरीकडे अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला तालिबान आणि हक्कानी नेटवर्कसहित त्यांच्या जमिनीवरुन कार्यरत असणा-या सर्व दहशतवादी संघटनांशी लढा देण्यासाठी निर्णयाक पाऊलं उचलण्यास सांगितलं आहे. 

दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला भरभरून मदत केली पण त्याच्या बदल्यात पाकिस्तानकडून अमेरिकेला फक्त खोटारडेपणा आणि फसवणूकच मिळाली, असे खडे बोल सुनावत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला अमेरिकेकडून दिली जाणारी २५५ दशलक्ष डॉलरची वार्षिक मदत बंद करण्याचे संकेत सोमवारी दिले होते.

गेल्या १५ वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलरहून अधिक आर्थिक मदत करण्याचा मूर्खपणा केला आणि आमचे (अमेरिकेचे) नेते मूर्ख आहेत, असे समजून त्या बदल्यात त्यांच्याकडून आमच्या वाट्याला फक्त खोटारडेपणा आणि फसवणूकच आली. आता बस्स झाले!, असे आक्रमक स्वरुपाचे ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला फटकारलं. 

पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देते असा आरोप करत ट्रम्प यांनी लिहिले की,' शेजारच्या अफगाणिस्तानात अमेरिका ज्या दहशतवाद्यांच्या मागावर आहे त्यांना पकडण्यास मदत करण्याऐवजी पाक त्यांना आश्रय देते'.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानUSअमेरिकाUnited StatesअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प