इस्लामाबाद- भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश एकाचवेळेस निर्माण झाले. एखाद्या खंडप्राय देशासारखा मोठा भूभाग लाभलेल्या भारतात बहुभाषिक, अनेकधर्मिय सांस्कृतीक स्थिती असूनही लोकशाही जपली गेली. मात्र पाकिस्तानात राजकीय स्थैर्य फारकाळ टिकले नाही. प्रचाराच्यावेळेस माजी पंतप्रधानांचा बॉम्बस्फोटात खून होणे, पदावरती असलेल्या पंतप्रधानांची हत्या होणे, माजी पंतप्रधानांना फाशी होणे, एखाद्या राजकीय नेत्याचा विमान अपघातात संशयास्पद स्थितीत मृत्यू होणे असल्या घटना पाकिस्तानात अगदी सामान्य म्हणाव्यात अशा घडतात.भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तान नवा देश तयार झाला. 1947 पासून पाकिस्तानात आजवर 29 पंतप्रधान सत्तेत आले असून त्यातील एक पंतप्रधान तर केवळ 4 दिवस पदावरती होते.पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान 50 महिने 2 दिवस पदावरती होते तर त्यांच्यापेक्षा 23 दिवस जास्त कार्यकाळ मिळण्याची संधी युसूफ रझा गिलानी यांना मिळाली. जुल्फीकार अली भुट्टो पाकिस्तानात 46 महिने पंतप्रधान होते. नवाज शरिफ यांना अनेकदा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली मात्र ते कधीही कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत. अयूब खान हे फक्त चार दिवस पंतप्रधान होते तर नुरुल अमिन 13 दिवस पंतप्रधान होते. पाकिस्तानच्या विविध पंतप्रधानांचा कार्यकाळ पुढीलप्रमाणेपंतप्रधान महिन्यांमध्ये कार्यकाळलियाकत अली खान 50 महिने 2 दिवस
ख्वाजा निजामुद्दीन 24 महिने
मुहम्मद अली बोगरा 27 महिनेचौधरी मोहम्मद अली 13 महिनेहुसैन शहीद सुर्हावर्दी 13 महिनेइब्राहिम इस्माइल चुंदरीगर 2 महिनेफिरोज खऱान नून 9 महिनेअयूब खान 4 दिवसनुरुल अमीन 13 दिवसझुल्फिकार अली भूट्टो 46 महिनेमोहम्मद खान जुनेजो 38 महिनेबेनझीर भुट्टो 20 महिनेगुलाम मस्तफा 3 महिनेनवाज शरीफ 29 महिनेबलख शेर मजारी 1 महिनानवाज शरीफ 1 महिनामोईनुद्दीन अहमद 3 महिनेबेनझीर भुट्टो 36 महिनेमलिक मिराज 3 महिनेनवाज शरीफ 31 महिनेजफरुल्लाह खान जमाली 19 महिनेचौधरी शुजात हुसैन 1 महिनाशौकत अजिझ 38 महिनेमुहम्मद मियाँ सुम्रो 4 महिनेयुसुफ रजा गिलानी 50 महिने 25 दिवसरजा परवेज 9 महिनेमीर हजार खान 2 महिनेनवाज शरीफ 49 महिनेशाहिद खाकान अब्बासी 9 महिनेनसीर उल मुल्क 1 महिना