पाकिस्तानच्या राजकारणात एक धक्कादायक ऑडिओ क्लिप लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि माजी पंतप्रधान इम्रान खान या दोघांचेही ऑडिओ पाकिस्तानी सोशल मीडियामध्ये व्हायरल होऊ लागले आहेत. यादरम्यान एका हॅकरने इम्रान यांची रहस्यमयी पत्नी बुशरा बीबीबाबत मोठा खुलासा केला आहे.
पीएमएलएनचे नेता नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाझ जेव्हा तुरुंगात होती तेव्हा तिच्या बाथरुममध्ये गुप्त कॅमेरा लावण्यात आला होता. हे सर्व बुशरा बीबीच्या सांगण्यावरून करण्यात आले होते. मरियम अंघोळ करत असताना तिचे न्यूड व्हिडीओ बनविण्याचा तिचा कट होता, असे या हॅकरने म्हटले आहे.
हॅकरने सांगितले की, मरियम नवाझचा न्यूड व्हिडीओ काढता आला तर तिला भविष्यात ब्लॅकमेल केला जाऊ शकेल, असे इम्रान खान व त्यांच्या पत्नीला वाटत होते. पाकिस्तानी टीव्ही चॅनल २४ एचडीला या हॅकरने माहिती दिली आहे. बुशरा बीबी यांनी तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांना मरियमच्या बाथरूममध्ये गुप्त कॅमेरा बसवण्यास सांगितले होते जेणेकरून गरज पडल्यास तिला ब्लॅकमेल करता येईल, असे तो म्हणाला.
याआधी मरियम नवाजनेही अनेकदा कबूल केले आहे की, कारागृहात तिच्या बाथरूममध्ये गुप्त कॅमेरा बसवण्यात आला होता. या हॅकरने इम्रान खानच्या कृत्यांबाबत अनेक खुलासे केले आहेत. इम्रान खानच्या सवयी इतक्या घाणेरड्या आहेत की ज्याची कल्पनाही करू शकत नाही. लवकरच असा ऑडिओ जारी करणार आहे ज्यामध्ये इम्रान खान कोणाला तरी शिवीगाळ करत आहेत. नवाझ शरीफ तुरुंगात गेल्यानंतर 'जिवंत' परत येऊ नयेत अशी बुशराची इच्छा होती, असेही हॅकरने म्हटले आहे