ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 19 - इस्लामिक स्टेटने सिंध प्रांतातील सूफी दर्ग्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध देशव्यापी धडक 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच अफगाणिस्तानच्या दुतावासाला पाकिस्तानने 76 दहशतवाद्यांची यादी सोपवली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पाकने दहशतवाद्याला कंटाळत अफगाणिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले आहेत. मिळालेल्या माहितेनुसार, पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये घुसून तेथील चार दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्तानने 76 दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, या अतिरेक्यांचा पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यामध्ये हात असल्याचे म्हटले होते. अशी मागणी 17 तारखेला पाकने केली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार खैबर पख्तूनख्वा प्रांतातदेखील 11 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ टीव्हीने सैन्य दलातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानमधील जमात उल अहरारच्या चार दहशतवादी तळांवर काल रात्री हल्ले करण्यात आले. परंतु या बाबत अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही. जर या हल्ल्याला दुजोरा मिळाला तर अफगाणिस्तानच्या जमिनीवर पाकिस्तानी सैन्याने केलेली अशाप्रकारची ही पहिलीच मोहिम असेल.
पाकचे सर्जिकल स्ट्राईक?,अफगाणिस्तानातील दहशतवादी तळ केले नष्ट
By admin | Published: February 19, 2017 10:13 AM