मंगळवारी पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. दरम्यान, यावर आता भारताने मोठी कारवाई केली. यामध्ये सिंधू नदी पाणी करार मोडला आहे. दरम्यान, आता यावर पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. पाकिस्तानही भारताच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या भारत सरकारने यावर कोणतेही उत्तर दिलेले नाही.
भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध ५ मोठे निर्णय घेतले आहेत. यात सिंधू पाणी करार मोडला आहे, तसेच अटारी इंटीग्रेटेड चेकपोस्ट तात्काळ बंद करण्यात आला आहे.
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
दरम्यान, आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी भारताच्या निर्णयांवर टीका केली आहे. बुधवारी एका वाहिनीशी बोलताना दार म्हणाले की, भारताने दहशतवादी घटनांबाबत कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. भारत रागाच्या भरात हे निर्णय घेत आहे.'भारताने दहशतवादी घटनांबाबत कोणतेही पुरावे दिलेले नाहीत, असंही ते म्हणाले.
इशाक दार म्हणाले, ज्यावेळी भारतात संकट येते तेव्हा त्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले जाते. भारताच्या घोषणांनंतर, पाकिस्तान एनएससी म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती दार यांनी दिली आहे. 'भारताचे विधान अयोग्य आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून त्याचे उत्तर दिले जाईल. दहशतवादावर अशा प्रकारे राग व्यक्त करणे योग्य नाही, असंही दार म्हणाले.
हे निर्णय घेतले
सरकारने अटारी इंटीग्रेटेड चेकपोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी आधीच वैध कागदपत्रांसह या मार्गाने भारतात प्रवेश केला आहे त्यांना १ मे २०२५ पर्यंत त्याच मार्गाने परतण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानच्या नागरिकांना सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पूर्वी जारी केलेले सर्व SVES व्हिसा आता अवैध मानले जातील आणि या व्हिसाखाली भारतात उपस्थित असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.