गाजा/जेरुसलेम : आपल्याकडे अन्य कोणताही पर्याय नसल्याचे सांगत इस्रायलने गाजा पट्टीवरील हल्ले बुधवारी तीव्र केले. दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या हल्ल्यांमधील बळींची संख्या २०८ वर पोहोचली आहे. इस्रायलने किनारपट्टीवरील पॅलेस्टिनी लोकांना घरे दारे सोडून जाण्यास सांगितल्यामुळे तो आता जमिनीवरूनही हल्ले करण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष थांबविण्यासाठी इजिप्तने युद्धबंदीचा एक प्रस्ताव सुचविला होता. इस्रायलने हा प्रस्ताव मान्य करत हल्ले थांबवले होते. मात्र, हमासने हा प्रस्ताव ठोकरून लावताना इस्रायलवरील रॉकेट हल्ले सुरूच ठेवले. त्यानंतर इस्रायलने पुन्हा हल्ले सुरू केले. मंगळवारी इस्रायलचा पहिला बळी गेला. हमासकडून करण्यात आलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात इरे क्रासिंगवर एक नागरिक ठार झाला. (वृत्तसंस्था)
पॅलेस्टिनींना घर सोडण्याचा इशारा
By admin | Published: July 17, 2014 12:31 AM