इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. या संघर्षाचे मूळ आहे अल-अक्सा मशीद. हे जेरुसलेममधील एक धार्मिक स्थळ आहे. हे जगभरातील मुस्लिमांचे श्रद्धा स्थान आहे. तर दुसरीकडे, ज्यूंसाठी हे त्यांच्या अस्तित्वाचे सर्वात मोठे प्रतीक. या जागेवरून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यो दोन्ही देशांमध्ये जुना वाद आहे. हा तणाव संपविण्यासाठी अमेरिकेसह जगातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. मात्र आजतागायत येथे शांतता प्रस्थापित झालेली नाही. आता चीन या दिशेनं पावलं टाकणार आहे.
याचाच एक भाग म्हणून चीनपॅलेस्टाइनसोबत चर्चा करत आहे आणि पॅलेस्टाइनही चीनच्या प्रयत्नांचा खुल्या मनाने स्वीकार करत आहे. पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास सध्या तीन दिवसीय चीन दौऱ्यावर आहेत. ते 13 जून रोजी येथे पोहोचले आहेत. त्यांचा हा पाचवा चीन दौरा आहे.
या दौऱ्यात महमूद अब्बास हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना भेटून पॅलेस्टाईनसंदर्भातील क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील. याशिवाय ते चीनचे पंतप्रधान ली कियांग यांचीही भेट घेणार आहेत. महमूद अब्बास यांच्या दौऱ्यापूर्वीच चीनने त्यांना आपला जुना मित्र असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही, तर पॅलेस्टानच्या नागरिकांच्या अधिकारांसाठी चीन नेहमीच त्यांचे समर्थन करत असतो, असेही चीनने म्हटले आहे.
चीनच्या पाठिंब्यामागचे राजकारण?चीनची संपूर्ण जगात एक अविश्वासू देश म्हणून ओळख आहे. त्यांच्या विस्तारवादी धोरणाला भारतही कंटाळला आहे. याच बरोबर त्याने आर्थिक आघाडीवरही जगाचे नेतृत्व करायला सुरुवात केली आहे. आता जागतिक पुढारी होण्यात चीनसमोर सर्वात मोठे आव्हान हे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे आहे. यामुळे अमेरिकेला साइड लाइन करण्यासाठी चीन अशा पद्धतीची पावले उचलत असल्याचे मानले जात आहे.
खाडी देशांसाठी अल अक्सा मशी आणि पॅलेस्टाईनची शांतता नेहमीच एक मोठा मुद्दा राहिला आहे. यातच चीनने संपूर्ण जगातील मुस्लिमांची नजर असलेल्या पॅलेस्टाइन हा आंतरराष्ट्रीय मुद्दा उचलला आहे. अशा प्रकारचा प्रयत्न करून चीन अरब देशांवरील आपली पकड मजबूत करून, पश्चिमेसमोर आणखी शक्तीशाली राष्ट्र म्हणऊन स्वतःला उभे करू इच्छित आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील शेवटची चर्चा 2014 मध्ये झाली होती. ही चर्चा म्हणजे, अमेरिकेच्या प्रयत्नांची फलश्रृती होती. आता चीन हा प्रयत्न करत आह. अशा स्थितीत चीनचे प्रयत्न इस्रायल-पॅलेस्टाईनमधील तणाव दूर करू शकतील का? हे पाहावे लागेल.