शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

Afghanistan: पंजशीरमध्ये अफगाण योद्ध्यांनी केलेले स्वागत पाहून तालिबानी हादरले; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 1:33 PM

Panjshir Valley under Attack of Taliban: एक असा प्रांत आहे ज्यावर रशियान सैन्याला आणि तालिबानलाही तेव्हा विजय मिळविता आला नव्हता. तालिबान अफगाणिस्तानात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असताना एक प्रांत अद्याप त्यांच्या ताब्यात आलेला नाही. य़ा प्रांताचे नाव आहे पंजशीर.

अजिंक्य असलेला पंजशीर (Panjshir) ताब्यात घेण्यासाठी तालिबानने (Taliban) दहशतवादी पाठविले आहेत. रशियाच्या सैन्याला, त्यानंतर तालिबानलाही ताब्यात न घेता आलेल्या अवघड आणि योद्ध्यांच्या पराक्रमाने भारलेला हा भाग तालिबानला नडला आहे. पंजशीरला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या 300 दहशतवाद्यांना अफगान योद्ध्यांनी (Panjshir Fighters) ठार केले आहे. या दाव्यानंतर तालिबानने असे घडलेच नसल्याचे म्हणत वृत्त फेटाळले. यामुळे अफगान योद्ध्यांनी तालिबानी दहशतवाद्यांची काय हालत केली, याचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. (Northern alliance fighters attacked a convoy of taliban who were gathered in surrounding of panjshir valley CLEAN FOOTAGE)

Vida Samadzai: मिस अफगानी! बिकिनी घालून रँम्प वॉक, बिग बॉसमध्ये रोमान्स; देशात उडवलेली खळबळ

यामध्ये दूरवर तालिबानी दहशतवाद्यांचे वाहन थांबलेले दिसत आहे. त्यावर अहमद मसूद यांच्या योद्ध्यांनी कसा हल्ला केला आणि त्यांना हवेत उडविले हे दिसत आहे. संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आलेले नाही. एक असा प्रांत आहे ज्यावर रशियान सैन्याला आणि तालिबानलाही तेव्हा विजय मिळविता आला नव्हता. तालिबान अफगानिस्तानात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असताना एक प्रांत अद्याप त्यांच्या ताब्यात आलेला नाही. य़ा प्रांताचे नाव आहे पंजशीर.

तालिबान आणि अल कायदाने मिळून 9/11 च्या हल्ल्याच्या दोन दिवस आधीच अहमद मसूद यांचे वडील अहमद शाह मसूद (Ahmad Shah Massoud) यांची हत्या केली होती. अफगानिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करजई (Hamid Karzai) यांनी अहमद शाह मसूद यांना राष्ट्राचे नायक असा खिताब दिला होता. त्यांना पंजशीरचा वाघही म्हटले जात होते. मसूद आणि त्यांच्य़ा साथीदारांनीच मिळून तालिबान राज संपविण्यात मोठी भूमिका निभावली होती. अहमद शाह मसूद यांनी सोव्हिएत रशियाला देखील पंजशीरची एक इंचही जागा घेऊ दिली नव्हती. त्यानंतर आलेल्या तालिबानलाही हा प्रांत कब्ज्यात घेता आला नव्हता. त्यांचा मुलगा पंजशीरचा नेता अहमद मसूद (Ahmad Massoud) तालिबानला शरण जाण्यास नकार दिला आहे. 

Afghanistan: हिम्मत लागते! अफगानिस्तान अजून पडलेले नाही; एक प्रांत अजूनही लढतोय

यामुळे तालिबानने तो प्रांत ताब्यात घेण्यासाठी दहशतवादी पाठविले आहेत. अहमद मसूद म्हणाले की, आम्ही युद्धाची तयारी केली आहे. मात्र यामधून तोडगा काढण्यासाठी तालिबानसोबत चर्चा झाली तर आम्ही चर्चेसाठीही तयार आहोत. आम्ही तालिबानला जाणीव करून देऊ इच्छा की, पुढे जाण्यासाठीचा एकमेव मार्ग हा चर्चा हा आहे. युद्ध सुरू व्हावे, अशी आमची इच्छा नाही. तालिबानला आव्हान देण्यासाठी अहमद मसूद यांनी आपले सैन्य उभे केले आहे. हे सैन्य अफगाण सैन्य, स्पेशल फोर्सेस आणि स्थानिक योध्यांची मिळून बनली आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानwarयुद्ध