क्युबेक : हा व्हिडिओ म्हणजे काही स्पेशल इफेक्टस नाही तर क्युबेकमधील जंगलाचा एक भाग प्रत्यक्ष खालीवर होताना टिपण्यात आलेला आहे. तेथील हालचाल जणू अशी दिसते की, तो भाग जिवंत आहे. श्वास घेतो आहे.भलेही ही घटना संशयास्पद व हॅलोवीनच्या जवळ जाणारी वाटली तरी प्रत्यक्षात या घटनेत काहीही गूढ जादू तेथे काम करत नाही. त्या खडकांखाली कोणतेही राक्षस निद्राधीन झालेले नाहीत की जंगलातील भूतशक्ती तेथे सक्रिय आहेत.सदर्न क्युबेक सिव्हीयर वेदर नेटवर्कचे मार्क सिरोईस यांनी याचा खुलासा केला की, ही हवामानशास्त्रासंबंधीची अपूर्व अशी घटना असून तीत मूलतत्वे सहज एकत्र येतात त्यातून असामान्य असे दृश्य बघायला मिळते. हे दृश्य टिपले गेले व व्हिडियोद्वारे आॅनलाईन व्हायरल केले गेले. तुम्ही तेथील झाडांकडे बघता तेव्हा वारे खूपच जोरदार वाहात असल्याचे स्पष्ट होते, असेही सिरोईस यांनी नमूद केले.जंगलाचा पृष्ठभाग हा शेवाळाने आच्छादलेला दिसतो व त्यामुळे अगदी तरूण झाडांच्या मूळांची साखळी ही सैल अशा पर्यावरण स्थितीत जाते. वाऱ्यामुळे झाडे इकडून तिकडे हलतात व तुम्हाला वाटते की मुळे तो पृष्ठभाग वर उचलत आहेत. यातून दिसते हे की तेथे श्वास घेतला जात आहे. (वृत्तसंस्था)सिरोईस यांचा हा खुलासा दुसºया एका हवामानशास्त्र तज्ज्ञाच्या मताशी मिळताजुळता आहे. या तज्ज्ञाने हे सांगितले की, दिसणारे दृश्य वेगळे वाटत असले तरी त्यात अस्वस्थ व्हावे, असे काही नाही. आता आम्हाला हे माहीत झाले आहे की, जंगल श्वास घेते व कार्बन डायआॅक्साईड व आॅक्सिजन सोडते. जे काही घडते ते काही श्वासोच्छ्वासाच्या अवयवाद्वारे नसून दोषच द्यायचा असेल तर वाºयाला द्यावा लागेल, असे हा तज्ज्ञ म्हणतो.
जंगलाचा भाग दिसतो श्वासोच्छ्वास घेताना, हवामानशास्त्रातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 4:49 AM