ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 12- समलैंगिक संबंध आजही अनेक देशात मनमोकळेपणाने स्वीकारले जात नाहीत. अनेक देशांमध्ये समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली असली तरी आजही असे काही देश आहेत जेथे समलैंगिक संबंध असणं गुन्हा मानलं जातं. पण समाजाचा संपूर्ण विरोध झुगारत बांगलादेशमधल्या मुस्लिम तरूणाने समलैंगिक विवाह केला आहे. हा विवाह करण्यासाठी सगळ्यांचा रोषही त्या तरूणाने स्वीकारला. समलैंगिक विवाह करणारा तो ब्रिटनमधला पहिला मुस्लिम तरूण ठरला आहे.
(फोटो सौजन्य: डेली मेल ऑनलाइन)
जाहेद चौधरी हा मूळचा बांगलादेशी असून तो ब्रिटनमध्ये राहिलेला आहे. मुस्लिम धर्मांत समलैंगिक संबधांना मान्यता नाही, असं घरचे आणि नातवाईक मंडळी त्याला सतत सांगत असायचे. समलैंगिक संबधांचं खूळ त्याच्या डोक्यावर चढलं आहे. तेव्हा हे खूळ उतरवण्यासाठी त्यांने धार्मिक गोष्टीत लक्ष घालावं, अशी सक्तीही त्याच्यावर करण्यात आली होती. जाहेद हा 24 वर्षीय असून सीनचं वय 19 वर्ष आहे.
कुटुंबाकडून मिळत असलेल्या या वागणुकीला कंटाळून जीव देण्याचा विचार जाहेदने केला होता. दोन वर्षापूर्वी एके दिवशी जाहेद समुद्र किनाऱ्यावर रडत बसला असताना तेथील एका तरूणाने त्याची विचारपूर केली होती. जाहेदची विचारपूस करणार त्याच तरूणासह त्याने विवाहगाठ बांधली आहे. त्या तरूणाचं नावं सीन रोगन असं आहे. जाहेद आणि सीन दोघांनी पारंपरिक कपडे परिधान करून लग्न केलं आहे. खरंतर गेल्यावर्षी जाहेदने सीनला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्नासाठी विचारलं होतं.
आणखी वाचा
कतरिना कैफ म्हणते रणबीरसोबतचे "ते" नाते अजूनही चांगलंच
देसी गर्ल करणार हॉलिवूड चित्रपटाची निर्मिती
अबब! त्यांनी नोकरांसाठी घेतला 265 कोटींचा बंगला
समलैंगिक विवाहकरून, मला कुणाचीही पर्वा नसल्याचं दाखवून दायचं होतं. तसंच समलैंगिक असणं हा आजार आहे आणि तो बरा होतो, असं माझ्या कुटुंबियांना वाटत होतं, त्यांना माझ्याकडून हे उत्तर आहे, असं जाहेदने म्हंटलं आहे. माझ्यासारखं असणाऱ्या मुलांना मला सांगायचं आहे, इट्स ओके. तुम्ही समलैगिक आणि मुस्लीम असू शकता त्यात काही गैर नाही, असंही तो पुढे म्हणाला. द टेलेग्राफने ही सविस्तर माहिती दिली आहे.
समलैंगिक लग्न केल्याने त्या दोघांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. काही जणांनी जाहेदला जीवे मारण्याची धमकीही दिली. अनेकदा जाहेदवर मुस्लीम तरूणांनी हल्लाही केला होता.