वॉशिंग्टन : वंशवादाला खतपाणी घालणारी वादग्रस्त टिपणी केल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करणारा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत पारित करण्यात आला. हा प्रस्ताव पारित झाल्यामुळे ट्रम्प यांचे राष्टÑाध्यक्षपद धोक्यात येणार नसले तरी त्यांना मोठा धक्का देणारी ही घटना असल्याचे समजले जात आहे. चार अश्वेत डेमोक्रॅटिक प्रगतिशील महिला खासदारांनी त्या जेथून आल्या आहेत, तेथे परत गेले पाहिजे, अशी टिपणीट्रम्प यांनी रविवारी अनेक टष्ट्वीटद्वारे केली होती व त्यावरून वादंग उठले होते.ट्रम्प यांच्या टिपणीचा निषेध करण्यासाठी अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत खासदार टॉम मलिनोवस्की यांनी प्रस्ताव सादर केला. ४३५ सदस्यांच्या सभागृहात प्रस्तावाच्या बाजूने २४०, तर विरोधात १८४ मते पडली. रिपब्लिकन्सच्या चार व एका अपक्ष खासदारानेही प्रस्तावाला पाठिंबा दिला. सभागृहात डेमॉक्रेटिक पक्षाचे बहुमत आहे. मलिनोवस्की यांनी म्हटले आहे की, राष्टÑाध्यक्ष जे शब्द वापरतात, ते अशांत मन असलेले लोक ऐकतात व त्यानंतर हिंसक होतात.
ट्रम्प यांच्याविरुद्ध अमेरिकी संसदेत प्रस्ताव पारित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 4:21 AM