ब्राझीलमध्ये शुक्रवारी झालेल्या एका विमानअपघातात ६२ जणांचा मृत्यू झाला. हे विमानब्राझीलमधील साओ पावलो शहराजवळ दुर्घटनाग्रस्त झाले होते. तसेच या अपघातात विमानामधील जवळपास सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला. दरम्यान, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या वाकप्रचाराप्रमाणे या अपघात एक जण बालंबाल बचावला. हा तरुणही याच विमानातून प्रवास करणार होता. मात्र उशीर झाल्याने कर्मचाऱ्यांनी त्याला विमानात चढू दिलं नाही. त्यामुळे तो विमानातून प्रवास करू शकला नाही. त्यानंतर काही वेळातच हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. मात्र विमानात न चढल्याने हा प्रवासी सुदैवाने बचावला.
याबाबत झालं असं की, अॅड्रियानो अॅसिस नावाच्या या प्रवाशाकडे अपघातग्रस्त झालेल्या विमानाचं तिकीट होतं. मात्र तिकीट असूनही अखेरच्या क्षणी उशीर झाल्याने त्याला विमानात चढता आलं नाही. त्यामुळे त्याचा पुढचा प्रवास झाला नाही आणि तो या दुर्घटनेतून बचावला.
प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अॅड़्रियाने अॅसिस याने सांगितलं की, मला विमान कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने विमानात जाण्यापासून अडवलं. त्यावरून माझा त्या कर्मचाऱ्याशी वादही झाला. मात्र तरीही त्याने मला विमानात बसू दिलं नाही, कारण मला थोडा उशीर झाला होता. बोर्डिंग गेटवर बसलेल्या व्यक्तीसोबतही माझा थोडा वाद झाला. मात्र तरीही मला विमानात बसू दिलं गेल नाही. मी वैतागलो होतो. मात्र जेव्हा या विमानाला अपघात झाल्याचं समजलं, तेव्हा मला ज्या कर्मचाऱ्याने विमानात जाण्यापासून रोखलं त्याला शोधून मी त्याला कडकडून मिठी मारली.
दरम्यान, अॅड्रियाने अॅसिसप्रमाणेच आणखी एका प्रवाशालाही उशीर झाल्याने हे विमान चुकलं आणि सुदैवाने त्याचे प्राण वाचले.