इस्लामाबाद : एकीकडे पाकिस्तानच्या पंतप्रधानांना अमेरिकेला जायला विमान मिळत नसताना पाकिस्तानने कराचीवरून थेट अमेरिकेच्या लॉस एन्जेलिसला ट्रेन रवाना केली आहे. यावरून पाकिस्तानमधील लोकच मोठ्या प्रमाणावर ट्रोल करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावार व्हायरल होत आहे.
पाकिस्तान कंगाल झाला आहे. यामुळे त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही अमेरिकेला जाण्यासाठी सरकारी विमान वापरता येत नाहीय. अमेरिकेहून परतीच्या मार्गावर असताना लिफ्ट दिलेल्या सौदीच्या राजाने चक्क विमान माघारी वळवत खान यांना विमानातून हाकलून दिले होते. यानंतर इम्रान खान यांनी प्रवासी विमानाने पाकिस्तान गाठले होते.
सौदीचा प्रिन्स पाकिस्तानच्या नापाक खेळीने नाराज; इम्रान खानला विमानातून हाकलले
आता पाकिस्तान आणखी एका गोष्टीवरून ट्रोल झाला आहे. या ट्रेनवर शेवटचे ठिकाण लॉस एन्जेलिस असे लिहीले होते. विशेष म्हणजे ट्रेनवर डिजिटल बोर्ड होता. हा व्हिडीओ पाकिस्तानच्या लोकांनीच बनविलेला आहे. आणि पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत हिने तो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. यामध्ये लोकांनी ट्रोल करताना, पहा पाकिस्तानने किती प्रगती केली आहे. आता पाकिस्तानचे लोक व्हिसाशिवाय अमेरिकेला जाऊ शकणार आहेत, असे म्हटले आहे.
या व्हिडीओमध्ये सुकुरच्या रोरी स्टेशनलरचा बोर्ड दाखविला आहे. ज्यावर ही ट्रेन कराचीहून लॉस एन्जेलिसला जात असल्याचे दिसत आहे. रेल्वेच्या कर्मचाऱ्याकडून झालेली चूक पाकिस्तानला खूपच महागात पडली आहे.
या नाचक्कीवरून पाकिस्तानच्या रेल्वे मंत्रालयाला सफाई द्यावी लागली आहे. रेल्वे मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत जर अल्लाने मनात आणले तर पाकिस्तान रेल्वे लॉस एन्जेलिसलाही रवाना होईल, हा कुठल्यातरी यात्रेकरूने केलेले प्रँक असू शकतो, अशी हसत हसत सारवासारव केली.