शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

पठाणकोट; पाकमध्ये ‘एफआयआर’ दाखल

By admin | Published: February 20, 2016 2:51 AM

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानी प्रशासनाने प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. तथापि, त्यात जैश ए मोहंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याच्या नावाचा उल्लेखच नाही

लाहोर/इस्लामाबाद : पठाणकोट दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानी प्रशासनाने प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. तथापि, त्यात जैश ए मोहंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर याच्या नावाचा उल्लेखच नाही. मसूद या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा भारताचा आरोप आहे. या हल्ल्याबाबत अनेक आठवडे चाललेल्या चौकशीनंतर अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. पंजाब प्रांताच्या गुजरानवाला येथील दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या (सीटीडी) केंद्रात गुरुवारी हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यासंदर्भात गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘एफआयआर’ची आवश्यकता होती, असे सीटीडीच्या अधिकाऱ्याने सांगितले. मसूद अझहर हा हल्ल्याचा सूत्रधार असून त्याचा भाऊ रऊफ आणि इतर पाच जणांनी तो घडवून आणल्याचे भारताचे म्हणणे आहे. पठाणकोट येथील हवाई तळावर दोन जानेवारी रोजी हल्ला झाला होता. चार हल्लेखोरांनी पाकमधूून भारतात येऊन हल्ला केल्याचे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकला कळविले होते. (वृत्तसंस्था)त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ०६/२०१६ असा या एफआयआरचा क्रमांक असून यात हल्ल्याबाबत अज्ञात लोकांविरुद्ध पाकिस्तान दंड संहितेच्या ३०२, ३२४ आणि १०९ कलमान्वये तसेच दहशतवादविरोधी कायद्याच्या कलम ७ व २१-१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी वापरलेल्या टेलिफोन क्रमांकांचाही एफआयआरमध्ये उल्लेख आहे. या हल्ल्यामुळे भारत-पाक परराष्ट्र सचिव चर्चा पुढे ढकलावी लागली होती. तेव्हापासून आतापर्यंत या चर्चेची तारीख ठरू शकलेली नाही. हल्ल्यामागे पाकमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहंमदचा हात आहे, असे भारताने ठामपणे सांगितल्यानंतर पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी याबाबत चौकशी करण्यासाठी पंजाब सीटीडीचे अतिरिक्त महानिरीक्षक राय ताहिर यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यीय चौकशी पथक स्थापन केले होते. याच पथकाच्या शिफारशीवरून हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एफआयआर दाखल झाल्यानंतर भारताकडून हल्ल्याबाबत आणखी माहिती मागवली जाईल, असे पाकच्या पंजाब प्रांतातील विधिमंत्री राणा सनाउल्ला यांनी शुक्रवारी सांगितले. ते लाहोर येथे पत्रकारांशी बोलत होते. या एफआयआरमधून पाकची दहशतवादाविरुद्धची बांधिलकी प्रदर्शित होते. या हल्ल्यात अझहरचा हात असल्याचे आढळून आले तर निश्चितपणे त्याच्यावरही खटला चालविला जाईल, असेही ते म्हणाले. पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानने नोंदविलेल्या एफआयआरमध्ये जैश- ए- मोहम्मद ही अतिरेकी संघटना किंवा या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याचे नाव समाविष्ट न केल्यामुळे भारताने शुक्रवारी आपली नाराजी व्यक्त केली.