शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

पीसीबी-बीसीसीआय प्रमुखांमध्ये चर्चा

By admin | Published: July 04, 2016 5:43 AM

शहरयार खान आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यादरम्यान आयसीसीच्या वार्षिक संमेलनामध्ये महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा झाली.

कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्यादरम्यान आयसीसीच्या वार्षिक संमेलनामध्ये महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यात पुन्हा द्विपक्षीय क्रिकेट संबंध सुरू करण्यासाठी तटस्थ स्थळावर मालिका आयोजित करण्याच्या शक्यतेबाबतच्या मुद्याचा समावेश आहे. पीसीबीच्या नजिकच्या सूत्रांनी सांगितले, की शहरयार यांनी गेल्या आठवड्यात एडिनबर्गमध्ये आयसीसीच्या बैठकीदरम्यान ठाकूर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा केली. दोन्ही बोर्डांनी तटस्थस्थळी द्विपक्षीय मालिका आयोजित करण्यासाठी योग्य कॅलेंडर तयार करण्याचा प्रयत्न करावा, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. उभय देशांदरम्यान दोन वर्षांत एकदा द्विपक्षीय मालिकेचे आयोजन व्हायला हवे. सूत्राने पुढे सांगितले, की पीसीबी प्रमुखांनी म्हटले, की पाकिस्तान भारतात खेळण्यास इच्छुक असल्यामुळे बीसीसीआयने मालिकेचे यजमानपद भूषवायला हवे. पाकिस्तानला ज्या वेळी यजमानपद भूषवायचे असेल त्या वेळी उभय देशांच्या बोर्डांच्या सहमतीने तटस्थस्थळाची निवड करण्याचा निर्णय घेता येईल. २०१६ च्या शेवटी किंवा २०१७ मध्ये उभय देशांदरम्यान पूर्ण द्विपक्षीय मालिकेच्या आयोजनासाठी आपल्या देशाच्या सरकारची परवानगी घेण्यासाठी दोन्ही देशांच्या बोर्डांच्या प्रमुखांनी सहमती दर्शवली. (वृत्तसंस्था)