पेडिक्युअर करुन घेणं एका महिलेला अतिशय महागात पडलं आहे. या महिलेला पेडिक्युअरमुळे आपला पाय गमवावा लागला. यानंतर त्या महिलेला नुकसान भरपाईच्या रुपात १.७५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास १३ कोटी रुपये द्यावे लागले. ही महिला अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणारी असून तिचं नाव क्लारा शेलमॅन असं आहे.
डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार महिलेनं पेडिक्युअर केल्यानंतर तिच्या रक्तात इन्फेक्शन झालं. सप्टेंबर २०१८ मध्ये ती एका सलॉनमध्ये पेडिक्युअर करण्यास गेली होती. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या एका कर्मचाऱ्यानं असुरक्षित अशा उपकरणाच्या माध्यमातून काम केलं. तसंच त्यानं आपल्या काही पॉलिसी फॉलो केल्या नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.
यानंतर २०२० मध्ये महिलेनं यासंदर्भात खटला दाखल केला. यादरम्यान महिलेला आर्टलरीसंबंधित समस्या निर्माण झाल्या होत्या. यानंतर तिच्या पायाच्या खालचा भाग कापून वेगळा करावा लागला. तर tampabay नं दिलेल्या वृत्तानुसार १६ डिसेंबर रोजी महिलेला सलॉनकडून नुकसान भरपाई देण्यात आली आहे. दरम्यान, ही नुकसान भरपाई मिळाल्यानंतर त्या महिलेला रडू कोसळलंय. यामुळे त्या महिलेला अनेक संकटांचा सामना करावा लागला. तसंच तिला चालण्याफिरण्यास त्रास होऊ लागला, इतकंच नाही, तर तिला तिचं घरही गमवावं लागलं. तसंच तिच्या मुलीलाही शाळेत जाणं शक्य होत नाही.