शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

लेबनॉनमध्ये जनक्षोभ!

By admin | Published: August 30, 2015 11:16 PM

लेबनॉन या मध्यपुर्वेतील देशामधील अशांतता सध्या जगभरामध्ये चर्चेत आहे. पायाभूत सुविधा देण्यास सरकार अपयशी ठरल्यावर जनक्षोभ कसा उसळू शकतो याचा

बैरुत : लेबनॉन या मध्यपुर्वेतील देशामधील अशांतता सध्या जगभरामध्ये चर्चेत आहे. पायाभूत सुविधा देण्यास सरकार अपयशी ठरल्यावर जनक्षोभ कसा उसळू शकतो याचा प्रत्यय राजधानी बैरुतमध्ये येत आहे. सार्वजनिक ठिकाणचा कचरा वेळीच न उचलला गेल्याने चालूू झालेल्या आंदोलनाने आता सरकारविरोधातच निदर्शने करायला सुरुवात केली आहे. आता सरकारचा निषेध करणारी यू स्टिंक ही मोहिमच सुरु झाली आहे.लेबनॉनमधील रस्त्यांवर पडणारा कचरा व्यवस्थित व वेळीच गोळा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. त्यातच सरकारने या भावनांना गांभिर्याने न घेतल्यामुळे कचऱ्याचे ढीग रस्त्यांवर साठतच गेले व चालणे-फिरणेही मुश्किल होऊन बसले. शेवटी लोकांनीच रस्त्यांवर उतरुन सरकारचा निषेध करण्याची भूमिका घेतली. इतके होऊनही कचऱ्याची समस्या सोडविण्याऐवजी सरकानने निदर्शकांना अश्रूधुर किंवा पाण्याचा वापर करिन पांगविण्याची पद्धती अवलंबिल्यामुळे निदर्शक अधिकच हिंसक झाले आहेत. कचरा पेटतो तेव्हा....कचऱ्याच्या प्रश्नाच्या निमित्ताने सरकार विरोधातील रागाची भावना सध्या बैरुतमध्ये बाहेर पडत आहे. शनिवारी शहिद चौकामध्ये जमून नागरिकांनी सरकारविरोधात निदर्शने केली. कित्येक लोकांनी कचऱ्याचे ढीग सरळ पेटवून दिले. तर अनेकांनी पोलिसांवर दगडफेकही केली. नागरिकांनी यू स्टिंक असे लिहिलेले शर्ट घालून सरकारला गृहमंत्री हटविण्यासाठी ७२ तासांचा अल्टिमेटम दिला. कचरा उचलण्याच्या पद्धतीचे विकेंद्रीकरण करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. कित्येक नागरिकांनी हा संपुर्ण देश म्हणजेच एक कचराकुंडी झाली आहे अशी भावना व्यक्त केली आहे.लेबनॉनचे राष्ट्राध्यक्षपद गेले एक वर्ष रिकामे आहे. खासदारांनी स्वत:ची मुदत २०१७ पर्यंत वाढवून घधेतली आहे. त्यानंतरच नव्या निवडणुका होतील. लेबनॉनलाही सीरियन स्थलांतरितांची झळ बसली आहे. गृहयुद्धाने ग्रासलेला आणि इसिसचा सर्वात जास्त तडाखा बसलेला सीरिया लेबनॉनचा सख्खा शेजारी आहे. त्यामुळे स्थलांतरितांनी सीमा ओलांडून लेबनॉनमध्ये प्रवेश केला आहे. आतापर्यंत ११ लाख सीरियन लेबनॉनमध्ये घुसले आहेत त्याचाही ताण लेबनॉनच्या अर्थव्यवस्था व सार्वजनिक व्यवस्थेवर आलेला आहे. आठवड्याभरापुर्वी या निदर्शनांनी उग्र स्वरुप धारण केल्यानंतर पंतप्रधाव तम्माम सलाम यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता आणि आंदोलने अशीच चालू राहिली तर सर्व व्यवस्था कोसळेल असे सूचित केले होते. 1975-1990इतका मोठा काळ यादवी युद्धाचा सामना केल्यानंतर गेल्या २५ वर्षात लेबनॉनची स्थिती फारशी बदलेली नाही. आजही विजेच्या तुटवड्याला बैरुतला सामोरे जावे लागते. त्यामुळेच आंदोलकांनी वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी कचऱ्याच्या निमित्ताने रेटली आहे.