टोकियो - जापानमधील (Japan) एका रुग्णालयात अजबच प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयात पाण्याची लाईन चुकून युरिनच्या लाईनला जोडली गेली. यामुळे लोकांना जवळपास तब्बल 20 वर्षांपर्यंत चक्क युरिनचेच पाणी (Toilet Water) प्यावे लागले. याची माहिती जेव्हा लोकांना मिळाली, तेव्हा ते अक्षरशः अवाक झाले.
1993 मध्ये झालीय रुग्णालयाची स्थापना - Wion या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, जपानी बातम्या आउटलेट Yomiuri Shimbun ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसरा, Osaka University च्या मेडिसिन विभागाने 1993 मध्ये हे रुग्णालय बांधले आहे. रुग्णालयाला पाण्यासाठी जवळच्याच एका विहिरीला कनेक्ट करण्यात आले. रुग्णालयाचे बांधकाम सुरू असतानाच या विहिरीचे पाणी अनेक भागांत पोहोचवण्यात आले होते.
पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाइनसोबत जोडलं गेलं टॉयलेट वाटर -वृत्तानुसार, पाण्याची (Drinking Water) कनेक्टिंग लाइन जोडताना प्लंबरकडून चुकून यूरिनची लाईन पिण्याच्या पाण्याच्या लाइनसोबत जोडली गेली. यामुळे लोक अनेक वर्ष यूरिनचे पाणीच (Toilet Water) पीत राहिले. याच बरोबर, त्याच घाणेरड्या पाण्याचा वापर लोक हात धुण्यासाठी, गुळणा करण्यासाठी आणि अगदी अंघोळीसाठीही करत होते. सुरुवातील लोकांना पाण्याची चव काहीशी वेगळी वाटली. पण त्यांनी विचार केला, की कदाचीत विहिरीच्या पाण्याची चवच अशी असेल. यामुळे त्यांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही.
2014 मध्ये समोर आली चूक - 2014 मध्ये रुग्णालय प्रशासन परिसरातच डायग्नोसिस एंड ट्रीटमेंट फैसिलिटी सेंटरचे काम करत असताना, व्यवस्थापन पथकाने पाणीपुरवठ्यासाठी रुग्णालयाच्या आवारातील इमारतीची पाहणी केली. तेव्ह अनेक शौचालयांच्या पाण्याचे पाईप चुकून पिण्याच्या पाण्याला जोडण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही चूक लक्षात येताच, पिण्याच्या पाण्याची चव नेहमीच खराब का लागते आणि आजूबाजूच्या इमारतींमधील पाणी गोड का आहे, हे रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आले. यानंतर, या पाईप लाईनची दुरुस्ती करण्यात आली.
'कुणालाही हेल्थ प्रॉब्लम नाही' -या घटनेला खरे तर 8 वर्ष झाली आहेत. मात्र, ही गोष्ट आतापर्यंत दबूनच होती. जपानी न्यूज आउटलेट Yomiuri Shimbun ने संपूर्ण प्रकार प्रसिद्ध केल्यानंतर, आता ही घटना जगासमोर आली आहे. हे समजल्यानंतर लोक अवाक झाले आहेत. तसेच विद्यापीठ प्रशासनाने दावा केला आहे, की असे होऊनही कधीच कुणालाही आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याचे समोर आले नाही.