ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २८ - वॉटर पार्क किंवा थीम पार्कमध्ये पिकनिकसाठी गेल्यानंतर काहीजणांना जास्त वजन किंवा शरीराच्या बेढब आकारमानामुळे एखाद्या राईडला मुकावे लागते. मनात इच्छा असूनही शारीरीक तंदुरुस्तीअभावी 'त्या' राईडचा आनंद घेता येत नाही. इंग्लंडच्या सरेमध्ये थॉर्प थीमपार्कमध्ये पिकनीकसाठी गेलेल्या एका महिलेच्या आनंदावर अशाच कारणामुळे विरजण पडले.
तान्या विलीस (२२) असे या महिलेचे नाव आहे. तान्याला पार्कातील रोलर कोस्टरच्या राईडमध्ये बसायचे होते पण ब्रेस्टच्या जास्त आकारमानामुळे तान्याला रोलर कोस्टरमध्ये बसण्यापासून रोखण्यात आले. रोलर कोस्टरमध्ये बसण-या व्यक्तीच्या संरक्षणासाठी एक स्टीलचा दरवाजा असतो.
तान्याच्या ब्रेस्टच्या आकारमानामुळे हा दरवाजा लागत नव्हता. तिच्या जिवीताला धोका असल्याने तिला परवानगी नाकारण्यात आली. मी जास्त जाड नाहीय पण सुरक्षा दरवाजा आणि आसन बनवताना मोठया आकाराचे ब्रेस्ट असणा-या महिलांचा विचार केलेला नाही. थॉर्प पार्कमधील हा अनुभव अत्यंत अपमानास्पद होते असे तान्याने म्हटले आहे.