Pervez Musharraf Passes Away :पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे दुबईत निधन झाले आहे. मुशर्रफ हे अनेक दिवसांपासून आजारी होते, त्यांच्यावर दुबईत उपचार सुरू होते. परवेझ मुशर्रफ यांना लष्करी हुकूमशहा असे संबोधले जायचे, ज्यांनी लष्करप्रमुख असतानाच देशात सत्तापालट करुन बंदुकीच्या जोरावर संपूर्ण देशात मार्शल लॉ जाहीर केला होता. तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, मुशर्रफ यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.
पाकिस्तानमधील एका विशेष न्यायालयाने डिसेंबर 2019 मध्ये मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मुशर्रफ यांनी देशाच्या घटनेला बगल देऊन देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा केल्याचे न्यायालयाने मान्य केले होते. पाकिस्तानमध्ये 12 ऑक्टोबर 1999 रोजी मुशर्रफ यांनी लष्करी उठाव करून नवाझ शरीफ यांना पाकिस्तानच्या सत्तेतून हटवले होते.
स्वतःला अध्यक्ष घोषित केलेसत्तेतून बेदखल झाल्यानंतर मुशर्रफ यांनी 2001 मध्ये स्वत:ला देशाचे अध्यक्ष घोषित केले. ते इथेच थांबला नाही, तर 3 नोव्हेंबर 2007 रोजी परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी जाहीर करताना देशाची घटना निलंबित केली. हा तो काळ होता जेव्हा मुशर्रफ यांनी पूर्णपणे राजकारणात प्रवेश केला होता. काही महिन्यांतच मुशर्रफ यांनी जनरल अशफाक कयानी यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यांनी स्वत: 23 नोव्हेंबर 2007 रोजी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
जेव्हा मुशर्रफ ब्लॅक लिस्ट झालेत्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. 2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मुशर्रफ यांनी लादलेली आणीबाणी बेकायदेशीर असल्याचा निकाल दिला होता. यानंतर 2013 मध्ये शरीफ सरकारने मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला. त्यानंतर सुमारे सहा वर्षे खटला चालला आणि मुशर्रफ सुनावणीला हजर राहिले नाहीत, असे अनेकवेळा घडले. त्यानंतर परदेशात पळून जाण्याच्या भीतीने सरकारने मुशर्रफ यांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकले.
उपचाराच्या बहाण्याने दुबईला पळून गेलेत्यानंतर 2016 मध्ये मुशर्रफ यांना उपचारासाठी परदेशात जाण्याची परवानगी मिळाली. ते दुबईला उपचाराच्या बहाण्याने गेले आणि पाकिस्तानात परतलेच नाही. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विशेष न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू राहिली आणि 17 डिसेंबर 2019 रोजी न्यायालयाने मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली. पण, मुशर्रफ न परतल्याने त्यांना फाशी मिळालीच नाही.