गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. लोक उपासमारीचे बळी ठरत आहेत. लोकांच्या घरात खायला धान्य नाही. वीज नसल्याने घरांमध्ये अंधार आहे. महागाईची परिस्थिती अशी आहे की, देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर आता सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहेत. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक डार यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेल 35 रुपयांनी महागले आहे.
देशाला संबोधित करताना इशाक डार म्हणाले की, पाकिस्तानी रुपया सतत घसरत आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या किमती 11 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ऑक्टोबर ते जानेवारी 29 या चार महिन्यांत सरकारने पेट्रोलच्या दरात वाढ केलेली नाही. उलट या काळात सरकारने डिझेल आणि रॉकेलचे दर कमी केले होते. पण, आता पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सूचनेनुसार आम्ही या चार उत्पादनांच्या किमान किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
याचबरोबर, आम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच केरोसीन तेल आणि लाईट डिझेल (एलडीओ) च्या दरात प्रत्येकी 18 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, असे इशाक डार यांनी सांगितले. याशिवाय, नवीन किंमतींच्या घोषणेमुळे पेट्रोलचा पुरवठा बंद झाल्याच्या अफवा दूर होतील, अशी आशा इशाक डार यांनी व्यक्त केली.
सध्याच्या पाकिस्तानमधील इंधनाच्या किमती?पेट्रोल - 249.80 रुपये प्रति लिटरडिझेल - 262.80 रुपये प्रति लिटररॉकेल - 189.83 रुपये प्रति लिटरहलके डिझेल तेल - 187 रुपये प्रति लिटर
पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगाइशाक डार यांच्या घोषणेपूर्वीच अनेक भागांत पेट्रोलचे दर प्रचंड वाढल्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोशल मीडियावर शेअर केलेल्या रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, 1 फेब्रुवारी रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 45 ते 80 रुपयांच्या दरम्यान कधीही वाढू शकतात.