लंडन : कोविड-१९ प्रतिबंधक लसीचे दोन डोस डेल्टा स्वरूपाच्या विषाणूविरुद्ध अधिक प्रभावी आहेत. भारतात करण्यात आलेल्या अध्ययनातून पहिल्यांदा हा निष्कर्ष काढण्यात आला होता, आता ब्रिटनमधील अध्ययनातूनही हाच निष्कर्ष निघाला आहे. तथापि, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अध्ययनानुसार फायझर आणि ॲस्ट्राझेनेकाची लस अल्फा विषाणूच्या तुलनेत डेल्टा स्वरूपाच्या विषाणूविरुध्द कमी प्रभावी आहे.
संशोधकांच्या अध्ययनात असे आढळले की, फायझर/ बायोएनटेक आणि ऑक्सफर्ड/ ॲस्ट्राझेनेकाची लस नवीन विषाणूपासून चांगली सुरक्षा देते. कोरोनाचा संसर्ग झालेला नसतानाही लस घेतली, त्यांच्या तुलनेत कोविड-१९ मुक्त झाल्यानंतर ज्यांनी लस घेतली, त्यांच्यात अधिक सुरक्षा आहे.
३ लाखांहून अधिक चाचण्यांचे विश्लेषणभारतात ऑक्सफर्ड/ ॲस्ट्राझेनेका लसीचे उत्पादन कोविशिल्ड या नावाने होत आहे. संशोधकांनी १ डिसेंबर २०२० आणि १६ मे २०२१ दरम्यान ३८४,५४३ लोकांच्या नाकातून आणि घशातून घेतलेल्या स्रावाच्या २५,८०,०२१ नुमन्यांच्या चाचण्यांचे विश्लेषण केले. १७ मे २०२१ आणि १ ऑगस्ट २०२१ दरम्यानही ३,५८,९८३ लोकांवर अध्ययन करण्यात आले.