मनिला - फिलिपिन्स सरकारने परदेशातून आयात करण्यात आलेल्या 68 आलिशान कारवर बुलडोझर चालवला आहे. फिलिपिन्समध्ये अवैधरीत्या आयात करण्यात आलेल्या वस्तूंवर कठोर कारवाई करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणून परदेशातून अवैधरीत्या आयात करण्यात आलेल्या सुमारे 70 लाख डॉलर किमतीच्या 68 कारचा सार्वजनिकरीत्या चुराडा करण्यात आला.ही कारवाई पाहण्यासाठी फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो रोआ डुतेर्ते स्वत: उपस्थित होते. बुलडोझर चालवून नष्ट करण्यात आलेल्या आलिशान कारमध्ये लेम्बोर्गिनी आणि पॉर्श आदी कंपन्यांच्या कारचा समावेश आहे. या कारवरील आयात कर न भरता दक्षिण आशियात पाठवण्यात आल्या होत्या दरम्यान, या कारवर बुलडोझर चालवतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
म्हणून फिलिपिन्स सरकारने 68 आलिशान कारवर चालवला बुलडोझर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 11:49 AM