शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

Philippines Landslide: भूस्खलनाने कुटुंब हिरावलं, पण तो वाचला; 20 तास फ्रीजमध्ये अडकला, बचाव पथकाने केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 10:18 AM

Philippines Landslide: शुक्रवारी फिलीपिन्समध्ये झालेल्या भूस्खलनात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. या मोठ्या घटनेतून एका 11 वर्षीय मुलाचा चमत्कारीकरित्या जीव वाचला.

Philippines Landslide: शुक्रवारी फिलीपिन्स देशात भूस्खलनाची मोठी घटना घडली. पण, या दुर्घटनेतून 11 वर्षीय मुलगा चमत्कारीकरित्या वाचला आहे. जीव वाचवण्यासाठी हा मुलगा दिवसभर एका फ्रीजमध्ये लपून बसला. न्यूयॉर्क पोस्टनुसार, बेबे शहरातील रहिवासी असलेला सीजे जस्मे नावाचा हा मुलगा आपल्या कुटुंबासह घरात बसला होता, तेव्हा अचानक मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. यात त्याचे संपूर्ण कुटुंब वाहून गेले, पण तो एकटा वाचला.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी बेबे शहरात मॅगी वादळ धडकले, यादरम्यान मोठ्या प्रमाणात भूस्खलनाची घटना घडली. यामुळे सीजे याच्या घरात मोठ्या प्रमाणात चिखल येऊ लागला. यातून वाचण्यासाठी तो घरातील फ्रीजमध्ये लपून बसला. वादळ शांत होईपर्यंत म्हणजेच, सूमारे 20 तास तो फ्रीजमध्ये होता. यादरम्यान, तो बेशुद्ध पडला. नंतर बवाच पथकाला नदीकिनारी एक तुटलेल्या अवस्थेतील फ्रीज दिसले, त्यात त्यांना सीजे जस्मे आढळला. 

बचाव पथकाने सांगितल्यानुसार, त्यांना जेव्हा जस्मे आढळून आला, तेव्हा तो शुद्धीवर नव्हता. बचाव पथकाने तात्काळ त्याला रुग्णालयात पाठवले. या भूस्खलनात त्याच्या पायाचे हाड मोडले, पण सुदैवाने त्याचा जीव वाचला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती बचाव पथकाने दिली आहे. 

जस्मेचे कुटुंबीय बेपत्ताफ्रीजमध्ये राहिल्यामळे जस्मेचा जीव वाचला, पण अद्याप त्याच्या कुटुंबाचा शोध लागलेला नाही. बचाव पथकाने सांगितले की, त्याची आई आणि धाकटा भाऊ बेपत्ता आहेत, तर त्याच्या वडिलांचा गुरुवारी झालेल्या भूस्खलनात मृत्यू झालाय. दरम्यान, वादळानंतर एकट्या बेबे येथे सुमारे 200 ग्रामस्थ जखमी झाले असून सुमारे 172 जणांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे 200 दशलक्षाहून अधिक लोकांना घर सोडावे लागले आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयlandslidesभूस्खलन