फिलिपाइन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर हजारो लोकांना संपूर्ण परिसर रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे. स्फोटानंतर गॅस, राख आणि कचरा सर्वत्र पसरला आहे. फिलिपाइन्समधील ताल ज्वालामुखीतून राखेचे मोठे ढग उठू लागले आहेत, त्यामुळे राजधानी मनिलाजवळील अनेक भागांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. फिलीपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सिस्मोलॉजी (फिव्हॉल्क्स) ने सांगितले की ज्वालामुखीतून निघणारा धूर आणि राखेचे ढग आकाशात १.५ किलोमीटरपर्यंत उंचावत असल्याचं दिसून आलं आहे. गॅस, राख आणि भयंकर उष्ण, वेगानं वाहणाऱ्या लाव्हा प्रवाहामुळे परिसरातील लोकांना स्थलांतरित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
ज्वालामुखीचा आणखी उद्रेक झाल्यास त्सुनामी येऊ शकते, असे फिवोल्क्स यांनी सांगितले. फिवोल्क्सने लेव्हल थ्री अलर्ट जारी केला होता, याचा अर्थ आणखी स्फोट होण्याची शक्यता आहे. "ताल ज्वालामुखीबाबत लेव्हल थ्री अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, ताल ज्वालामुखी बेटातील बिलीबिनवांग आणि बन्यागा आणि बटांगसचे अॅगोन्सिलो शहर रिकामे केले पाहिजे. ताल तलावावरील सर्व कामकाज थांबवण्यात आलं आहे आणि विमानांना या भागात न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे", असं फिव्हॉल्क्सनं म्हटलं आहे.
ताल ज्वालामुखी हा फिलीपिन्समधील सर्वात सक्रिय ज्वालामुखीपैकी एकताल ज्वालामुखीच्या शिखरावर ताल तलाव आहे. तलावाच्या चाहरी बाजूंना लोक राहतात, मात्र ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्यांना घरं सोडावी लागली आहेत. येथे राहणाऱ्या लोकांना तीन वर्षांत तिसऱ्यांदा घर सोडावं लागलं आहे. ताल ज्वालामुखी हा फिलीपिन्समधील सर्वात सक्रिय ज्वालामुखीपैकी एक आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेने सांगितलं की, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर चिखलाचा पाऊस पडत होता. या मातीतून प्रचंड दुर्गंधी येत असून श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं. अधिकृत आकडेवारीनुसार, येथे १२ हजार लोक या परिसरात राहतात.