डॉ. खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली: इसायली कंपनी एनएसओ ग्रुपने तयार केलेल्या पेगासस स्पायवेअरवापरून मे-२०१९ मध्ये १४०० व्हॉट्सअॅप खाती हॅक केली होती, असा निकाल अमेरिकन फेडरल न्यायाधीशांनी दिला आहे. याबाबत व्हॉट्सअॅपला द्यावयाची आर्थिक नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी मार्च २०२५ मध्ये सुनावणी होणार आहे. व्हॉट्सअॅपने २९ ऑक्टोबर २०१९ रोजी एनएसओ समूहाविरुद्ध खटला दाखल केला होता. यात भारतासह जगभरातील सरकारी अधिकारी, राजकीय व्यक्ती, पत्रकार, मुत्सद्दी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचा संवेदनशील डेटा काढण्यासाठी त्यांच्या मोबाइलमध्ये गुपचूप स्पायवेअर इन्स्टॉल करण्यात आल्याचा आरोप होता. फक्त सरकारलाच विक्री सॉफ्टवेअर फक्त सरकारलाच विकतात. विक्रीनंतर पेगाससच्या वापरावर त्यांचे नियंत्रण मर्यादित असते, असा दावा एनएसओने बचावात केला होता. तो खोटा सिद्ध झाला.
न्यायाधीशांनी निकालात काय म्हटले?
यात यूएस फेडरल आणि राज्य हॅकिंग कायद्यांचे, विशेषतः संगणक फसवणूक आणि गैरवर्तन कायद्याचे उल्लंघन झाले आहे.
व्हॉटसअॅपच्या सेवा व अटींचे उल्लंघन केले आहे.
कोर्टाच्या आदेशानुसार स्पायवे- अरचा सोर्स कोड दिला नाही.
भारतात काय झाले?
भारतात सर्वोच्च न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमली होती. ऑगस्ट २०२२ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने तोंडी म्हटले की समितीकडे सादर ६ फोनमध्ये मालवेअर सापडले आहेत. मात्र ते पेगासस असल्याची पुष्टी होऊ शकली नाही.
'चौकशी करणार का?'
३०० भारतीयांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकांना कसे लक्ष्य केले होते हे आता सिद्ध झाले आहे. न्यायालय आता पुढील तपास करणार का, असा प्रश्न काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सूरजेवाला यांनी उपस्थित केला.